Akshargranth
Arte Na Parte अरतें ना परतें by Praveen Dasharath Bandekar प्रवीण दशरथ बांदेकर
Arte Na Parte अरतें ना परतें by Praveen Dasharath Bandekar प्रवीण दशरथ बांदेकर
Couldn't load pickup availability
Arte Na Parte अरतें ना परतें by Praveen Dasharath Bandekar प्रवीण दशरथ बांदेकर
लिहिते लेखक वर्तमानकाळाविषयी कसा विचार करतात, समाज आणि संस्कृतीतल्या कळीच्या दुखण्यांविषयी त्यांची काय निदानं आणि वेदना आहेत हे त्यांच्या अन्यलेखनातून वाचकांना तुलनेनं लवकर पोहचू शकतं. कादंबरी, कथा किंवा कविता वाचकांपर्यंत पोहचायला वेळ लागू शकतो. त्यामुळे मोठमोठे लेखक जाणिवपूर्वक वृत्तपत्रांमधूनही नियमित लेखन करीत आलेले आहेत. तिकडं डिकन्स आणि ट्वेनपासून ते हेमिंग्वे, मार्केझ, माया अन्गेलूपर्यंत अशी बरीच नावं घेता येतील, ज्यांनी सर्जनशील लेखनासोबतच वृत्तपत्रांमधूनही लेखन केलेलं आहे. मराठीतही अनेक लेखकांनी हा मार्ग निवडलेला आहे. हा एकप्रकारे सकारात्मक हस्तक्षेप ठरत असतो. त्यामुळे प्रवीण बांदेकर यांच्यासारख्या संवेदनशील कवीच्या आणि गद्यलेखकाच्या वर्षभर नियमितपणे प्रकाशित होत गेलेल्या लेखांच्या स्तंभाचे असंख्य नियमित वाचक तयार होत गेले. दर वेळी त्यातून रसरशीत, जिवंत असं संवेदनशील कवीनं चिंतेनं, आस्थेनं, कळवळ्यानं लिहिलेलं गद्य वाचायला मिळत होतं. या गद्याला लेखकाची स्वतःची अशी खास भाषा, त्याच्या भाषेत सहज वाहात आलेले शब्द, म्हणी, दंतकथा, वाकप्रचार आणि वेगळा मालवणी गोडवा आहेच; पण त्यापलीकडे एका गंभीर लेखकाचं समांतर चिंतनही आहे. मानसिक पातळीवर ऊर्ध्वमूल होत जाणारी नाती, नात्यांतली रहस्यं, ओरबाडला जाणारा निसर्ग आणि पर्यावरणाचा अंदाधुंद नाश, अमानूष होत जाणारा माणूस, संस्कृतीसंचितातल्या चीजा दाखवणारं ऐश्वर्य, पर्यावरणाचा निर्बुद्ध ऱ्हास, कोकणची संस्कृती, मानसिक विस्थापनं, मानवी मनाची गूढं हे सगळं त्याच्या या लेखनातून दिसत असतांना वाचकाच्या मनातही समांतर काही निनादत राहण्याचे बिंदू त्यातून खचितच सापडतील. - गणेश विसपुते
Pravin Dashrath Bandekar | Papyrus Prakashan | Latest Edition | Marathi | Hardbound | Pages 152 |
Share
