Akshargranth
Asa Ghadlo Mi By Gavardhan Wanakhed Medha Marathe
Asa Ghadlo Mi By Gavardhan Wanakhed Medha Marathe
Couldn't load pickup availability
Asa Ghadlo Mi असा घडलो मी, एका दलित समाजशास्त्रज्ञाचा जीवनप्रवास Govardhan Wankhede by Medha Marathe
विदर्भातील एका खेड्यात गरीब महार कुटुंबात तो जन्माला आला. खाण्याची आबाळ आणि उपचारांचा अभाव यामुळे त्या कुटुंबात मुलं जगत नसत. पण तो जगला. कधी मागते मागून मिळालेलं, तर कधी शिळंपाकं अन्न, कधी मेलेल्या गुरांचं मांस यावर तो वाढला. आईबरोबर तो शेतमजूर म्हणून कामाला जायचा. लाजिरवाणं जिणं जगत होता तो आणि त्याच्या वस्तीतील बाकीचेही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वस्तीच्या जीवनात प्रकाश पेरला. आंबेडकरांच्या विचारांनी त्याचंही घर उजळलं. तो शिकू लागला. शिष्यवृत्ती मिळत गेली आणि तो शिकत शिकत दिल्लीतील जेएनयुमध्ये पोचला. हा प्रवासही सोपा नव्हता. प्रत्येक टप्प्यावर अडथळे होते. अगणित अडचणींतून वाट काढत तो चालत राहिला आणि समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यानं स्वतःला सिद्ध केलं. देशापरदेशात स्वतःचं अस्तित्व जाणवून दिलं. विदर्भातील एक दलित मुलगा समाजशास्त्रज्ञ होण्याचा हा रोमांचक प्रवास व्यक्तिगत उरत नाही; तो समाजाच्या खालच्या थरातील माणसांच्या
जीवनसंघर्षाचा वर्णनात्मक आलेख बनतो.
Share
