Akshargranth
Asahmatiche Awaj असहमतीचे आवाज by Romila Thapar रोमिला थापर, Milind Champanerkar
Asahmatiche Awaj असहमतीचे आवाज by Romila Thapar रोमिला थापर, Milind Champanerkar
Couldn't load pickup availability
Asahmatiche Awaj by Romila Thapar, Milind Champanerkar असहमतीचे आवाज - रोमिला थापर, मिलिंद चंपानेरकर
असहमती ही काही आधुनिक काळातील संकल्पना नाहीये, परंतु, असहमतीचे विविध आकृतिबंध ओळखणं ही गोष्ट मात्र या काळासाठी नवी आहे. हेसुद्धा तितकंच खरं की, खऱ्या अर्थाने उदारमतवादी, लोकशाहीवादी असलेल्या समाजात असहमती व्यक्त करणारे प्रश्न उपस्थित केले गेले, तर भुवया उंचावल्या जात नाहीत; उलट, अशा प्रश्नांची कसून तपासणी करणं, त्यांची चर्चेद्वारे तड लावणं, अशा गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातं. प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आता सार्वजनिक आहे आणि कुणीही नागरिक तो अधिकार बजावू शकतो. पूर्वी असा अधिकार समाजातील केवळ सामर्थ्यवानांना होता, परंतु, आता हा अधिकार सर्व नागरिकांना आहे – किमान तत्त्वतः तरी. पूर्वीच्या काळी अशा अधिकाराबाबत वारंवार वाद जरूर व्हायचे, परंतु, सहसा ते सार्वजनिकरित्या वादाचे मुद्दे बनत नसत – जसे आजच्या काळात होतात. त्यामुळे, आज असहमती सामाजिक जीवनाच्या मध्यवर्ती कशी आहे, ते ओळखण्याची आणि समजून घेण्याची जबाबदारी अंशतः तरी आपल्यावर येते.
Romila Thapar | Milind Champanerkar | Papyrus Prakashan | Latest edition | Marathi | Hardbound | Pages 183 |
Share
