Akshargranth
Astitva अस्तित्व - सुहास शिरवळकर Suhas Shirvalkar New Marathi Book
Astitva अस्तित्व - सुहास शिरवळकर Suhas Shirvalkar New Marathi Book
Couldn't load pickup availability
'अस्तित्व' ही सुहास शिरवळकरांची कादंबरी माझ्यासाठी किंवा माझ्यासारख्या नाटकावर प्रेम करणाऱ्या, नाटक जगणाऱ्या कलावंतांसाठी, प्रेक्षकांसाठी अत्यंत उत्तम दर्जाची अशी साहित्य कलाकृती आहे. नाटकाचं इतकं सखोल विश्लेषण खूप दिवसांनंतर मला या कादंबरीत सगळ्या पात्रांच्या, परिस्थितीच्या माध्यमातून वाचायला मिळालं. मला वाचताना असं वाटलं की, आपण एकदा आपलंच जुनं आयुष्य - जेव्हा आपण या कलाक्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हाचं आयुष्य-जगतो आहोत की काय ! तो जो 'शोध' एक अभिनेता म्हणून सुरू झाला आहे, तो 'शोध' अजूनही सुरूच आहे, आपण इथे का आहोत? आपला उद्देश काय आहे? आपल्याला नेमकं काय करायचं आहे? गहन प्रश्न कुठल्याही कलाकाराला, कुठल्याही माणसाला पडतात. ते फार विलक्षण पद्धतीने शिरवळकरांनी या कादंबरीत हाताळले आहेत. क्षेत्र कुठलंही असो, एकाच गोष्टीकडे दोन विभिन्नपणे बघणाऱ्या प्रवृत्ती जेव्हा समोर येतात तेव्हा मला असं वाटतं की तो संघर्ष, तो लढा तिथे उपस्थित होतो आणि तोच लढा या माध्यमातून शिरवळकरांनी मांडायचा प्रयत्न केला आहे. सृजन जन्म देणं, निर्माण करणं, म्हणजे नेमकं काय? त्याचाही फार सुंदर असा वेध शिरवळकरांनी या कादंबरीतून घेतला आहे. कुठल्याही लेखकाचं यश हेच असतं की तो आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतो. आणि ही कादंबरी सुहास शिरवळकर आपल्याला तो विचार करायला भाग पाडतात. सुबोध भावे
Share
