Akshargranth
AUSHADHI SANGRAH By VAMAN G DESAI औषधे संग्रह - वामन गणेश देसाई
AUSHADHI SANGRAH By VAMAN G DESAI औषधे संग्रह - वामन गणेश देसाई
Couldn't load pickup availability
AYURVEDIC EDUCATIONAL BOOK
आज जगभरात मान्यता असणाऱ्या भारतीय आयुर्वेदामध्ये अनेक औषधी वनस्पतींची माहिती आढळते. वेगवेगळ्या कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या ह्या वनस्पती हा एक अमूल्य ठेवाच आहेत. ह्या औषधी वनस्पतींचे महत्त्व लक्षात घेऊन आणि त्यांच्याबद्दलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी ह्या हेतूने १९२७ साली डॉ. वामन गणेश देसाई ह्यांनी 'औषधी संग्रह' ह्या ग्रंथाची रचना केली. संपूर्ण भारतात दोनवेळा फिरून जाणकारांकडून माहिती घेऊन जास्तीत जास्त वनस्पतींची नावे, उपयोग, गुणधर्म ह्यांची माहिती मिळवली. एवढेच नाही, तर इंग्रजीमध्ये ह्या वनस्पतींना काय म्हणतात हेही जाणून घेतले आणि 'औषधी संग्रह' हा ग्रंथ तयार झाला.
ह्या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास ९०० वनस्पतींची माहिती ह्यामध्ये आहे. त्या वनस्पतींचे वर्णन, त्या ओळखायच्या कशा, त्यांच्या कुठल्या भागाचा कसा उपयोग करायचा अशी सर्व माहिती ह्यामध्ये आहे. आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी, वनस्पतींची आवड असणाऱ्यांसाठी आणि नैसर्गिक उपचारपद्धतीचा अवलंब करणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे एक खजिनाच
Share
