Skip to product information
1 of 1

Akshargranth

Avyakrut अव्याकृत

Avyakrut अव्याकृत

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

ह्या अपरिभाषित कवितांच्या अदृष्टाचे काव्यशास्त्र अंधारवीणेच्या सुरांतून उमटले आहे, नदीच्या अप्रकट प्रवाही गूढात साकळलेली वियोग, हानी, यातना आणि अपेष्टांची उपरुदितं ह्या कवितांतून खळाळत आहेत. मानवी अंतर्मनाचा तळठाव घेणाऱ्या ‘स्व’ च्या संज्ञाप्रवाहाची ही मुक्त धारा आहे. आत्मभान आणि प्रतिमांच्या बीजस्रोताची गुंफण करत, एका स्वायत्त अनुभवाचा, शाश्वत सत्याचा शोध घेणारी अक्षय शिंपीची कविता आहे. ‘बिनचेहऱ्याच्या कभिन्न तुकड्या’चं करुणाख्यान ह्या कवितांतून आता एक अभंग स्वर आळवत आहे. मुक्तछंद, रिपोर्ताज, अभंग-चरणके ह्या पातळ्यांवर लीलया वावरणारी ही कविता व्यक्तिमत्त्वातलं खोल दुभंगलेपण, अंधारपीठांच्या भीषण वास्तवात नितळपणाची होत जाणारी शकलं आणि शब्द-अर्थवलयांच्या आर्ततेवर नेमकेपणाने बोट ठेवते. इथला ‘मी’ आणि ‘तू’ हे अन्योन्याश्रयी आहेत.

ह्या अव्याकृत कवितांत कभिन्न शुभ्रतेच्या ओटीवर अंधाराचे कंदील लागतात, इथे कवितेची नाळच अंधारगर्भ आहे, प्रश्नांना निळेपण लाभले आहे, ह्याशिवाय इथे दिसतात मजारीचे नक्षीदार टवके, जाळीदार उन्हे. ह्या कवितांत पार आहे, झाड आहे, ऊन आहे, मी आहे. वाहण्याची, साचण्याची, तळाची, लाटांची गोष्ट सांगणारं, गोष्ट पोसता पोसता गोष्ट होत गेलेलं पाणी आहे. तसेच इथे ऐकू येतात कविता लिहितानाचे अरण्यआक्रोश, आणि अंगावर येतं ते अखंड हिंस्र, वाहणारं, घुमणारं, निर्मनुष्य शहर आणि लाल रक्तगार बर्फागत ठिबकत राहणारी काश्मीर नावाची अक्षय्य तमोगोत्री यातना.

जे अंगावरून वाहून गेलं आहे, ते नसांत, धमन्यांत रुतून बसलेलं आहे, ह्या धूसराच्या बळावर स्वतःला तपासत माणूसपणाचा वेध घेणारी, जीवनाच्या अर्थशून्यतेचा प्रत्यय देणाऱ्या एकाकीपणाशी नाळ जुळून असणारी अशी निर्व्याकृत कविता हे मानवी अनुभवांचं संश्लेषण आहे. भावनांचा लिप्ताळा टाळून, कोसळणाऱ्या काळावर अलिप्तपणे भाष्य करून जाणाऱ्या ह्या वास्तवसन्मुख कवितेतून एक क्लेशकारक भान निपजत राहतं.

– जयश्री हरि जोशी

Avyakrut अव्याकृत by Akshay Shimpi

Lokvadmay Grih Prakashan |

View full details