Akshargranth
Ayodhechi Urmila अयोध्येची ऊर्मिला by Smita Datar
Ayodhechi Urmila अयोध्येची ऊर्मिला by Smita Datar
Couldn't load pickup availability
रामायणात पुसट उल्लेख असलेली ऊर्मिला, चौदा वर्षं पतीच्या विरहाचं दुःख सोसत राहिली, एवढीच काय ती आपल्याला तिची ओळख. मात्र प्रत्यक्षात ही राजस्त्री कशा प्रकारचं आयुष्य जगली असेल ? राम-लक्ष्मण-सीता वनवासात गेल्यावर मागे उरलेल्या ऊर्मिलेच्या अनुल्लेखानं ती विस्मृतीत गेली. आयुष्यभर राजभवनात राहिलेल्या ऊर्मिलेलाच खरा वनवास घडला. तरीही एकाकी पडलेली ऊर्मिला, मनस्वीपणे आयुष्याला भिडली. याचं सहज आणि ओघवत्या शैलीतलं चित्रण या कादंबरीतून अनुभवायला मिळतं. ऊर्मिलेच्या आयुष्याचा, तिच्या अस्तित्वाचा आणि तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा अतिशय वेगवान आणि रोचक पद्धतीनं या कथानकातून समोर येतो. ही काल्पनिक कादंबरी रामायणकालीन सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचंही प्रभावी चित्रण करते. इतिहासाच्या गर्भात काही कहाण्या चिरविश्रांती घेत असतात. चैतन्याचा स्पर्श झाल्यावर त्या सुप्तावस्थेतून बाहेर येतात. त्यावर चढलेली काळाची पुटं विरत जाऊन त्या जिवंत होतात. पुरातत्त्व संशोधक असलेल्या स्त्रीला झालेली, रामायण काळातल्या एका उपेक्षित स्त्रीची ओळख तिच्याही जाणिवा बदलून टाकते आणि ऊर्मिलेची उलघाल थेट वर्तमानकाळातल्या स्त्रीच्या जगण्याला येऊन भिडते. भूतकाळातल्या सावल्यांनी स्त्रीचा भविष्यकाळ गडद न करता, त्यातल्या अनुभवांच्या किरणांनी तो उजळावा, हेच सांगतेय ही 'अयोध्येची ऊर्मिला'.
Granthali |
Share
