1
/
of
1
Akshargranth
Bhalchandra Nemade Ani Bhasha Visheshank Maymavashi, Ganesh Vispute
Bhalchandra Nemade Ani Bhasha Visheshank Maymavashi, Ganesh Vispute
Regular price
Rs. 260.00
Regular price
Rs. 260.00
Sale price
Rs. 260.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
....भालचंद्र नेमाडे यांच्या सगळ्याच भाषाविषयक समग्र कामगिरीचा ह्या संपादकीयात आढावा घेता येणं कठीण आहे. परंतु, त्यांनी भाषेसाठी केलेल्या संस्थात्मक कामाचा किमान उल्लेख जरूर केला पाहिजे. अनुसुचीत नसलेल्या भाषांचाही केंद्रीय साहित्य अकादेमीनं विचार केला पाहिजे, ह्यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. भारतातल्या २२ राष्ट्रीय भाषांपलीकडे सोळाशेपेक्षा जास्त भाषा आहेत. त्या त्या भाषांमध्ये हजारो वर्षं संचित झालेलं ज्ञान आहे. अशा भाषांमधील लिहिणाऱ्यांचा सन्मान व्हायला हवा, त्यातील किमान काही भाषा निवडून त्यांच्यासाठी नियमित उपक्रम योग्य निधी उपलब्ध करून सुरु करावेत, ह्या आदिवासी भाषांमधलं साहित्य भाषांतरित व्हावं, ह्यासाठी नेमाडे अतिशय तळमळीनं आग्रह धरत होते. ह्यातल्या बऱ्याच योजना कार्यान्वित होऊ शकल्या. 'इंडियन लिटरेचर इन ट्रायबल लँग्वेजिस' ही ग्रंथमलिका त्यांच्या पुढाकारानं सुरु झाली आणि त्यांच्या प्रयत्नांळे 'खासी फोक साँग्ज अँड टेल्स', 'गारो लिटरेचर' 'मिझो सॉग्जस् अँड फोक टेल्स' अशी काही पुस्तकं भाषांतरित होऊन प्रकाशित झाली. ह्याच प्रकारे भिल्ली, कुंक्ना, गढवाली, बोडो, संथाली ह्या भाषांमधील साहित्यही प्रकाशित होऊ लागलं आहे. संस्थेमध्ये निष्ठेनं काम करताना त्यांनी केलेलं हे योगदान मोलाचं आहे.
Ganesh Vispute | Papyrus Prakashan | Latest edition | Marathi | Paperback | Pages 250 |
Share
