Akshargranth
Bhashanrang Vyaspeeth Ani Rangpeeth By Ashok D. Ranade
Bhashanrang Vyaspeeth Ani Rangpeeth By Ashok D. Ranade
Couldn't load pickup availability
भाषणरंग व्यासपीठ आणि रंगपीठ – अशोक दा. रानडे Bhashanrang Vyaspeeth Ani Rangpeeth By Ashok D. Ranade
मनुष्य किंवा प्राणी यांच्या कंठातील यंत्रणेतून निर्माण होऊ शकणारा विशिष्ट ध्वनी म्हणजे आवाज. काहीसे अलंकारिक बोलावयाचे तर भाषणामागची शक्ती किंवा क्षमता म्हणजे आवाज असेही म्हणता येईल. आवाज या माध्यमाचे व्यासपीठ आणि रंगपीठ या दोन्ही ठिकाणी फार महत्त्व आहे. अशोक रानडे हे अनेक वर्षे या माध्यमाविषयी संशोधन करीत होते. आवाजाचे दोन आविष्कार, गायन आणि भाषण. दोहोंना ध्यानात घेऊन अभ्यास केला तर आवाजाचे मर्म कळते अशी खात्री पटल्याने तसा अभ्यास रानडे यांनी चालविला यामुळे दोहोंसाठी निरनिराळे अभ्यासक्रम आखणे या पुस्तकातून शक्य झाले आहे. संपूर्ण शास्त्रीय संशोधनावर आधारलेल्या या पुस्तकाच्या अभ्यासाने आवाजात आणि भाषणात निश्चितच बदल घडू शकतील.
Share
