Skip to product information
1 of 1

Akshargranth

Bhintit Rachalelya Dolyanch Bhagdad by krushnat Khot

Bhintit Rachalelya Dolyanch Bhagdad by krushnat Khot

Regular price Rs. 335.00
Regular price Rs. 375.00 Sale price Rs. 335.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

भिंतीत रचलेल्या दगडी डोळ्यांचं भगदाड । कृष्णात खोत | Bhintit Rachalelya Dolyanch Bhagdad by krushnat Khot

कृष्णात खोत यांची ‘भिंतीत रचलेल्या दगडी डोळ्यांचं भगदाड’ ही कादंबरी गावपातळीवरचं अमानुष सत्ताकारण, पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेची दडपशाही, त्यातली विघटनशील नैतिकता आणि त्यातून उपजणारी, केव्हाही उसळून येऊ शकेल अशी सुप्त हिंसा या सगळ्याचं उत्कट आणि भेदक चित्रण करते. या वास्तवाचे एकमेकांत गुंतलेले विद्रूप कंगोरे उजेडात आणताना ही कादंबरी त्या वास्तवाचं सोयिस्कर मिथकीकरण आणि घटनांचं आख्यायिकेत होणारं रुपांतर वाचकासमोर उलगडून दाखवते.  या आख्यायिकांच्या मुळाशी गाडल्या गेलेल्या बळींच्या वेदनाही पृष्ठभागावर आणते. दीर्घ लयीच्या जिवंत, प्रवाही वाक्यांमधून कादंबरीचं निवेदन पात्रांच्या जगण्यातले घट्ट ताणेबाणे विणत आणि स्फोटक तपशील पेरत पुढे जातं. गोष्टीचं गोष्टपण न गमावता, भडक नाट्यमयतेचा धोका सहज टाळून हे निवेदन वाचकाला या जगण्याकडे सहृदयतेनं बघायला लावतं. गोष्ट रचता रचता रचण्याची प्रक्रिया वाचकासमोर उसवत जातं. मात्र, हे करताना रचण्याच्या प्रक्रियेवर असलेला सत्तेचा टोकदार अंकुश निवेदक कधीच नजरेआड होऊ देत नाही. कठोर वास्तवाचा खडक ओल्या मुळासारखा भेदून जाणारी लेखकाची भाषा जगण्यातल्या विरुपाबरोबरच त्यातली कोवळी निरागसताही सामावून घेते. ही कादंबरी सामाजिक वास्तववादाच्या चकव्यात न अडकता आख्यानाच्या अधिक समावेशक आणि कल्पनाशील वाटेनं पुढे जाते. म्हणूनच ती आशयाचं गांभीर्य शाबूत ठेवत वाचनीयता अबाधित राखण्यात यशस्वी होते.

Lokvadmay Gruh |

View full details