Akshargranth
Bhramatun Satyakade by Vikat Anil Kumbhar
Bhramatun Satyakade by Vikat Anil Kumbhar
Couldn't load pickup availability
भ्रमातून सत्याकडे
पाप-पुण्याविषयीची भीती आणि स्वर्ग-नरकाच्या कथांचा आधार घेऊन देवाच्या नावाखाली सामान्य माणसाला कसे घाबरवले जाते आणि त्यातून काही स्वार्थी लोक स्वतःचा हेतू साध्य करून लोकांच्या जीवनाशी खेळतात, या डोळ्यांनी पाहिलेल्या सत्यावर ही कादंबरी आधारित आहे. तटस्थपणे पाहिल्यावर देवपणाचा आव आणून लोकांना फसवणाऱ्या, अंधविश्वासाच्या नावाने घराघरांत कलह निर्माण करणाऱ्या आणि भीती दाखवून लोकांची संपत्ती लुटणाऱ्या प्रवृत्तींमुळे माणुसकी धोक्यात आल्याची जाणीव होते; पण या गर्द अंधारातून बाहेर पडण्यासाठी तरुण, शिक्षक, डॉक्टर, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी धैर्याने प्रश्न विचारत गावोगाव सत्याचे बी पेरले आहे. खरा देव मंदिरात नसून तो माणुसकीतच वसलेला आहे, हा मुख्य संदेश देणारी ही कथा जरी ग्रामीण पार्श्वभूमीवर उभी असली, तरी त्यातील सत्य सर्वत्र लागू होणारे आहे आणि वाचकाला त्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसेल.
Vikat Anil Kumbhar | Sakal Prakashan | 2026 | Marathi | Paperback | 76 |
Share
