Akshargranth
Career FAQs by Prof. Vijay Navale करिअर FAQs
Career FAQs by Prof. Vijay Navale करिअर FAQs
प्रा. विजय नवले यांचे 'करिअर FAQs' हे पुस्तक म्हणजे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात करिअरविषयक मार्गदर्शन आहे. मुलं आठवी-नववीत गेली की घरोघरी करिअरविषयक चर्चा सुरू होतात. विद्यार्थी, पालकांना काय शिक्षण घ्यावं, कुठल्या करिअरला स्कोप आहे असे एक ना अनेक प्रश्न पडलेले असतात. या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली की मुलांच्या करिअरला योग्य दिशा मिळायला मदत होते. दहावी, बारावीनंतरचे कोर्सेस, परीक्षा, पदव्या, त्यासाठी असणाऱ्या प्रवेश परीक्षा या सगळ्याची माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल. मुलांच्या करिअरची चर्चा घरात सुरू होण्यापूर्वीही हे पुस्तक वाचलं तर कदाचित पालकांना आपल्या मुलांच्या क्षमता ओळखता येतील, त्यानुसार त्यांना दिशा देता येईल. तसेच ९वी, १०वीच्या मुलांनीही हे पुस्तक वाचले तर त्यांनाही आपल्याला आवडणारे विषय नीटपणे लक्षात येतील, आपल्याला नक्की काय करायचं आहे हे कळायला मदत होईल. त्यामुळे सर्व पालक आणि मुलांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगाचे आहे.
Prof. Vijay Navale | Sakal Prakashan |