Akshargranth
Chavhata : Bharatiya Nisarga-Paryavaranacha by Santosh Shintre
Chavhata : Bharatiya Nisarga-Paryavaranacha by Santosh Shintre
Couldn't load pickup availability
चार वाटा किंवा रस्ते जिथे एकत्र येतात, ती जागा म्हणजे चव्हाटा. सार्वजनिक हिताचे विषय चर्चेसाठी येणारे सामूहिक चर्चाविश्व (पब्लिक स्फीअर) असा त्याचा अधिक गंभीर अर्थ. भारतीय निसर्ग-पर्यावरणाचा असा चव्हाटा त्याबाबतच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शास्त्रीय अंगांच्या वाटांनीच साकारतो.
आपला भवताल समग्र समजून घेण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. अशा चव्हाट्यावरील चर्चा रोखठोक असतात. विषयाच्या एरवी कुणीतरी, कुठेतरी लपवू पहात असलेल्या काही बाजू तिथे निश्चित उमटतात. चारही रस्त्यांमार्गे आलेल्या माहितीची तिथे देवाणघेवाण होऊन प्रश्नांचे वस्तुनिष्ठ आकलन होते. त्यातल्या प्रश्नांचे सहजी न कळणारे काही पैलू चव्हाट्यावर भीडभाड न बाळगता सामोरे येतात.
हे पुस्तक भारतीय निसर्ग-पर्यावरणातील काही ज्वलंत प्रश्न, त्यांच्यामागील आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शास्त्रीय गुंतागुंत अशाच रोखठोक पद्धतीने चव्हाट्यावर आणते.
भारतीय निसर्गातील बऱ्याच सकारात्मक गोष्टी, सौन्दर्यही सामोरे आणते.
सजग वाचकांना आणखी विचारप्रवृत्त आणि कृतीशील होण्यासाठी महत्वाचे संदर्भ पुरवते.
Santosh Shintre | Sakal Prakashan |
Share
