1
/
of
1
Akshargranth
Dagina by Nivrutti Jori, Sakal Prakashan
Dagina by Nivrutti Jori, Sakal Prakashan
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 200.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
- ग्रामीण महाराष्ट्रातील जनजीवनाचा धांडोळा कथांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न निवृत्ती जोरी यांनी ‘दागिना’ कथासंग्रहाच्या निमित्ताने केला आहे. लेखकाची ही दुसरी साहित्यकृती.
- यासंग्रहातील प्रत्येक कथा ही लेखकाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या घेतलेल्या अनुभवांवर आधारित आहे.
- समाजातील उपेक्षित घटकांचा संघर्ष एका संवेदनशील लेखकाच्या मनाला साद घालतो, तेव्हा त्याच्या लेखणीतून ‘दागिना’सारखी साहित्यकृती जन्माला येते, असे हे पुस्तक वाचताना ठायीठायी जाणवते.
- नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागांत वास्तव्य घडले, तेव्हा लेखकाने सरकारी फायलींच्या ढिगाऱ्यापलीकडे पाहात समाजस्थितीचे जे निरीक्षण केले, त्यातून ह्यासर्व कथा आकारास आल्या आहेत.
- कष्टकऱ्यांना रोजच्या जीवनात कोणकोणत्या अडचणींचा मुकाबला करावा लागतो, याचे चित्र वाचकांसमोर रेखाटताना लेखक कधी सर्वसामान्यांचा वन्यजीवनाशी झालेला संघर्षकथन करतो, तर कधी हातातोंडाची गाठ पडण्यासाठी काहींना करावीलागणारी तारेवरची कसरतउभी करतो.
- जेवढ्या उत्साहाने मानवी भावभावनांचे तरल चित्रण लेखकाने केले आहे, तेवढ्याच जोशात ग्रामीण साहित्याचा वाचकवर्ग त्यास प्रतिसाद देईल, ही अपेक्षा.
Sakal Prakashan |
Share
