Akshargranth
Dainandin Prerana by Dr Kamlesh Soman दैनंदिन प्रेरणा - डॉ कमलेश सोमण
Dainandin Prerana by Dr Kamlesh Soman दैनंदिन प्रेरणा - डॉ कमलेश सोमण
Dainandin Prerana Disha Ani Drushti by Dr Kamlesh Soman, Jeevan Anandgaonkar - दैनंदिन प्रेरणा - डॉ कमलेश सोमण, Goel Prakashan New Arrivals
जीवनाचे सारे वैभव-सौंदर्य, संघर्ष, विपत्ती, दुःख, अश्रू हे सारे जाणावे आणि तरीही आपले मन साधे ठेवावे, ही एक मोठी कला आहे. प्रत्येकाला, अगदी प्रत्येकाला दु:खाला सामोरे जावे लागतेच! आपण आपल्या अंतरंगात खोलवर जाऊन तपासले, तर आपल्याला समजून येईल की, दु:ख आपल्याला अधिक शहाणे आणि समजूतदार करते. दु:ख आपल्यातील ‘मी’पणा मिटवते. दुःख-वेदनेची आपण अबोल साथ जर स्वीकारली तर, आपण प्रेम-करुणेच्या दिशेनेही जाऊ शकतो. अखेरीस दु:ख हा एक प्रकारे आपल्याला बसलेला धक्काच असतो. जी दुःखे आपण एकट्याने एकांतात भोगतो, ती आपल्या आतले अवकाश अधिक विस्तारतात. जे. कृष्णमूर्ती म्हणतात, ‘दु:ख माणसाला एकटं करतं आणि इतरांपासून तोडून टाकतं! आपण या दु:खाच्या फार आहारी जाण्याचे टाळले पाहिजे. दु:ख जर अटळच असेल, तर ते सूज्ञपणे सहन करून व त्याच्या फारशा खाणाखुणा मागे न ठेवता, त्यातून बाहेर कसे पडावे, हे आपल्याला कळले पाहिजे. ज्या माणसाला अगदी जाणीवपूर्वक सुबुद्धपणे दु:ख कसे भोगायचे हे कळते, त्याला अगदी खराखुरा असा जगण्यातला परमानंद कळतो. मात्र यात दु:खापुढे नुसती मान तुकवणे किंवा दु:खाचा अपरिहार्य स्वीकार असता कामा नये. आपण दु:ख स्वीकारावे, ते सहन करावे, असे म्हणत नाही, तर त्या दु:खाबरोबर काही हालचाल न करता, काही कृती न करता राहण्याबद्दल मी बोलत आहे. त्यातून महान करुणा उपजते आणि त्या करुणेतून सर्जन घडते.’
Dr Kamlesh Soman | Jeevan Anandgaonkar | Goel Prakashan | New Edition | Marathi | Paperback | Pages 262 |