Akshargranth
Date With Devdas
Date With Devdas
Couldn't load pickup availability
Date With Devdas By Yojana yadav
तुझ्या कथा काही वर्षांपूर्वी वाचल्या असत्या तर माझ्याच आयुष्यातील काही गोष्टी अधिक उमदेपणाने निभावून नेता आल्या असत्या, काही निसटून गेलेल्या गोष्टी कदाचित थांबवता आल्या असत्या असं वाटलं.हे मी योजनाच्या कथा वाचल्यानंतर तिला कळवलं. तिच्या कथा वाचून मला तसं मनापासून वाटलं होतं. अर्थात ह्या कथा काही अशा उद्देशाने लिहिलेल्या नाहीत हे उघड आहे. पण त्या आपल्या सभोवतालच्या वर्तमानातल्या ज्या घोंगावणाऱ्या वादळात आपण डोळे मिटून उभे आहोत, त्या वादळाचं आतून दर्शन घ्यायला भाग पाडतात. कुणाला ह्या नातेसंबंधांच्या पडझडीच्या कथा वाटतील. कुणाला त्या नव्या नातेसंबंधांच्या नवनिर्मितीच्या कथा वाटतील. पडझड काय किंवा नवनिर्मिती काय, दोन्हींचा वास्तुविन्यास मात्र सारखाच आहे. त्या विन्यासातून ह्या कथा तुमचं बोट धरून फिरवतील. मग ती पडझड आहे की नवनिर्मिती आहे, हे ज्याच्यात्याच्यावर सोपवलेलं. पडझड आणि नवनिर्मिती ह्या दोन्हींच्या मधला प्रदेश नेहमीच ओसाड असतो. त्या ओसाडभूमीवरून ह्या कथा वाचताना पडझडपूर्व आणि निर्मितीपश्चात अशी दोन्ही जगं वाचक म्हणून मला पाहता आली. आणि एक चिमूटभर सत्य हाताला लागलं. त्याचं श्रेय ह्या कथांमधील जिवंतपणाला, उमदेपणाला, नीडरपणाला आणि स्वच्छ करारी दृष्टीला. - अभिषेक धनगर
Walden Publication |
Share
