Akshargranth
Dhulakshare Itihasachi 1, 2, 3 by Anwesh Sengupta, Prachi Deshpande
Dhulakshare Itihasachi 1, 2, 3 by Anwesh Sengupta, Prachi Deshpande
Couldn't load pickup availability
Dhulakhare Itihasachi 1, 2, 3 by Anwesh Sengupta, Prachi Deshpande
धुळाक्षरे इतिहासाची 1 : देशाची फाळणी
या पुस्तकात काय वाचाल?
• देशाची फाळणी होते म्हणजे नेमकं काय आणि भारत-पाकिस्तानमध्ये फाळणीमुळे काय घडलं?
• या फाळणीला कोण आणि कसं कारणीभूत ठरलं? हिंदू आणि मुसलमानांमध्ये कधी व कशी जुंपली?
• एकाच देशाचे दोन भाग वेगळे करताना काय राजकारण घडलं? त्या राजकारणामुळे सर्वसामान्य
नागरिकांना काय झळ सोसावी लागली?
• या फाळणीने जयराज, बीथीताई, करीम नासिर यांच्यासारख्या कुटुंबाची ससेहोलपट कशी झाली?
डोळे आणि कान उघडे ठेऊन इतिहास कसा शिकायचा? इतिहासाचे भान असणे म्हणजे काय? पाठ्यपुस्तकांत सांगितलेल्या इतिहासापलीकडचा, सर्वसामान्य लोकांचा इतिहास मुलांनी कसा जाणून घ्यायचा? या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधातून ‘धुळाक्षरे इतिहासाची' या पुस्तकमालेचा जन्म झाला. ‘देशाची फाळणी', ‘देशाचे लोक' आणि ‘देशाच्या भाषा' अशी मूळ बंगाली भाषेतील तीन पुस्तकं या मालिकेत अनुवादित केली आहेत. निराळ्या प्रादेशिक दृष्टीकोनांतून सांगितलेला हा इतिहास मुलांसह सर्वांनाच विविध प्रांतांच्या इतिहासाकडे अधिक आकर्षित करेल आणि इतिहासाबद्दल प्रश्न विचारायला उद्युक्त करेल, अशी आमची आशा आहे.