Akshargranth
Dhyanswasthya : Nirogi Jeewanasathi Dhyangatha
Dhyanswasthya : Nirogi Jeewanasathi Dhyangatha
Couldn't load pickup availability
Dhyanswasthya : Nirogi Jeewanasathi Dhyangatha by Manoj Patwardhan
योगशास्त्रातील ध्यानाचा संबंध फक्त अध्यात्माशी आहे, वैद्यकीय आणि वैज्ञानिक निकषांवर ते टिकणार नाही असा चुकीचा समज पसरवला जात असताना ध्यानावर होत असलेल्या जागतिक संशोधनाकडे मनोज पटवर्धन यांनी लक्ष वेधले आहे. चांगले छंद ही ध्यानाची पूर्वतयारी आहे याची जाणीव करून देत असताना ‘काहीही न करणे म्हणजे ध्यान’, या ध्यानाच्या अतिशय महत्त्वाच्या व्याख्येची ओळख त्यांनी करून दिली आहे. ‘योगनिद्रा’ हे योगशास्त्राने दिलेले एक अद्भुत वरदान आहे. या अतिशय प्रभावी, योग्य प्रक्रियेविषयी त्यांनी सविस्तर लिहिले आहे. त्याच्या पूर्वतयारी पासून ते योगनिद्रेतून हळुवारपणे बाहेर येण्याच्या स्थितीपर्यंत सर्वच पायऱ्या त्यांनी छान समजावून सांगितल्या आहेत.
मनोज पटवर्धन यांनी आजवर केलेली योगसाधना, त्यांचे चौफेर वाचन, सखोल अभ्यास या साऱ्याला असलेली मननाची आणि चिंतनाची जोड यांमुळे त्यांच्या लेखनाला एक वेगळे परिमाण लाभले आहे. साधी सोपी भाषा, अवघड विषय सोपा करून सांगण्याची हातोटी आणि मुख्य म्हणजे विषयाबाबतची तळमळ यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.
Share
