Akshargranth
Digital Banking By Rajeev Joshi
Digital Banking By Rajeev Joshi
Couldn't load pickup availability
सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवहारांचा कोश म्हणून बँकांकडे पाहिले जाते. डिजिटल बँकिंगरूपी जादूच्या कांडीने बँकांचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. ऑनलाईन व्यवहारांमुळे बँकांचे काम काहीसे सोपे झाले असले तरी बँकेच्या प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणणेही गरजेचे झाले. डिजिटल तंत्रज्ञानयुक्त बँकिंग व्यवहार सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरले असले तरी सायबर गुन्हेगारांना हे आयतेच कुरण मिळाले आहे.
बँकिंग तज्ज्ञ राजीव जोशी यांनी या माहितीपर पुस्तकात डिजिटल प्रणालीविषयी सोप्या भाषेत सोदाहरण माहिती दिली आहे. त्याचबरोबर विविध वयोगटातील ग्राहकांबरोबरच दिव्यांगांसाठीही डिजिटल तंत्रज्ञान किती फायदेशीर ठरते आहे, हे सांगितले आहे. त्याचबरोबर डिजिटल गुन्हेगारीविषयी माहिती देत या दुष्टचक्रात अडकू नये, म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Share
