Akshargranth
DIGITAL MARKETING SAHAJ SOPE - डिजिटल मार्केटिंग सहज सोपे
DIGITAL MARKETING SAHAJ SOPE - डिजिटल मार्केटिंग सहज सोपे
Couldn't load pickup availability
DIGITAL MARKETING SAHAJ SOPE - डिजिटल मार्केटिंग सहज सोपे by Prafulla Sutar
व्यवसाय, उद्योगात डिजीटल किंवा इंटरनेट मार्केटिंग हा एक महत्वाचा घटक. भाग म्हणून ओळखला जात आहे. संपूर्ण जग डिजीटल होत असून मार्केटिंगही याला अपवाद राहिलेले नाही. कमी खर्चात, कमी वेळेत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी, तसेच व्यवसायाला ब्रँड तयार करण्यासाठी व्यवसाय, उद्योग, कंपन्या डिजीटल मार्केटिंगचा वापर प्राधान्याने करू लागले आहेत. त्याचे रिझल्टही त्यांना झपाट्याने मिळत आहेत. डिजीटल मार्केटिंग केवळ व्यवसाय वाढीचे नव्हे तर नवनवीन रोजगारांची निर्मिती करणारे साधन झाले आहे.
ज्याच्याकडे स्मार्टफोन, इंटरनेट, सोशल मीडिया या गोष्टी आहेत. अशा कोणालाही डिजीटल मार्केटिंग करता येणे शक्य आहे. फक्त त्यांना दिशा देण्याची गरज आहे. छोटे व्यावसायिक, किराणा दुकानदार, नवीन व्यवसाय, उद्योग सुरु करू इच्छिणारे, बचतगट, महिला, विद्यार्थी अशा सर्वांना नजरेसमोर ठेवून डिजीटल मार्केटिंग सहज सोपे हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. कोणालाही या पुस्तकाच्या आधारे डिजीटल मार्केटिंग करता येईल, हा हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू आहे आणि तो यशस्वी होईल असा विश्वासही वाटतो.
Prafulla Sutar | Multiversity Prakashan |
Share
