Akshargranth
Divya Pravachanamrut by Ravindra Kamble रविंद्र कांबळे लिखित ‘दिव्य प्रवचनामृत’
Divya Pravachanamrut by Ravindra Kamble रविंद्र कांबळे लिखित ‘दिव्य प्रवचनामृत’
Couldn't load pickup availability
रविंद्र कांबळे लिखित ‘दिव्य प्रवचनामृत’ हा एक आध्यात्मिक ग्रंथ आहे. यात हरीपाठातील भक्तिमार्ग, ज्ञानेश्वरीत सांगितलेला गीतेचा भावार्थ आणि भगवद्गीतेचे अर्थपूर्ण तात्पर्य सोप्या आणि ओघवत्या भाषेत लेखकाने विस्तृतपणे सांगितले आहे.
हा एक त्रिगुणात्मक आणि सत्त्वगुणी असा ग्रंथ आहे, ज्याच्या नित्यपठणाने आणि चिंतनाने भगवंताविषयी दृढ श्रद्धा निर्माण होईल. या ग्रंथात एकूण सत्तावीस अभंग दिले आहेत. त्या अभंगांतून एखाद्या प्रवचनकाराप्रमाणे सविस्तर आध्यात्मिक विवेचन लेखकाने या पुस्तकात केले आहे. या ग्रंथाचे वाचकांनी पारायण करावे या उद्देशाने लेखकाने प्रस्तुत ग्रंथाची मांडणी केली आहे. ग्रंथात जगदीश आणि ज्ञानेश्वरांची आरती दिलेली असून प्रार्थना देखील आहे. ‘दिव्य प्रवचनामृत’ हा ग्रंथ प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येकासाठी आणि विशेषकरून प्रवचनकारांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून उपयुक्त आहे.
Ravindra Kamble | Sakal Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback |
Share
