Akshargranth
Dnyanranjak Kavyakodi
Dnyanranjak Kavyakodi
Couldn't load pickup availability
Dnyanranjak Kavyakodi by Eknath Avhad, Sakal Prakashan
एकनाथ आव्हाड आता छान छान काव्यकोडी घेऊन बालकुमार वाचकांच्या भेटीला आले आहेत. उमलत्या वयातील मुलामुलींना, एकमेकांना कोडी घालायला आणि कोडी सोडवायला खूप आवडते. कोडी ऐकताना किंवा वाचताना ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक येते. ही चमक उत्कंठेची असते, उत्सुकतेची असते, जाणून घेण्याची असते. काव्यकोडी तशी कमीच लिहिली जातात. जी लिहिली आणि छापली जातात, ती फारशी रंजक आणि उत्कंठावर्धक असतात, असेही नाही. ही अडचण लक्षात घेऊन आव्हाड यांनी जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्वक उत्तमोत्तम काव्यकोडी लिहिली आहेत.
या कोड्यांमध्ये विषयांची विविधता आहे. विविध खेळ आणि खेळाडू, समाजसुधारक आणि शास्त्रज्ञ, संशोधक आणि क्रांतिकारक, लेखक आणि कवी, गडकिल्ले आणि शहरे, पशुपक्षी आणि फुलेफळे, धान्य आणि खाद्यपदार्थ, व्याकरणातील रूक्ष आणि अवघड संकल्पना, आपली ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांच्याविषयीची रंजक माहिती कोड्यांच्या माध्यमातून सांगितली आहे. म्हणी आणि वाक्प्रचारही यातून सुटले नाहीत.
आयते ज्ञान मिळण्याच्या या काळात कोड्यांचा मनोरंजक खेळ दुर्मीळ होत चालला आहे. अशा कालखंडात या कोड्यांच्या माध्यमातून मनोरंजन आणि ज्ञान जिवलग मित्रांसारखे हातात हात घालून आले आहेत.
Sakal Prakashan |
Share
