Akshargranth
Dr Ambedkaranchya Sahawasat by Dr Savita Bhimrao Ambedkar
Dr Ambedkaranchya Sahawasat by Dr Savita Bhimrao Ambedkar
Couldn't load pickup availability
Dr Ambedkaranchya Sahawasat by Dr Savita Bhimrao Ambedkar - डॉ. आंबेडकरांच्या सहवासात
माझी भूमिका यशोधरेची ! डॉ. आंबेडकरांच्या जीवनात माझा प्रवेश झाला तेव्हा ते डायबेटीस, न्युरायटीस, संधीवात, रक्तदाब आदी व्याधींनी त्रस्त होते. त्यात १९५३ साली त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला. त्यातून ते कसेबसे बाहेर पडले, पण त्यांची प्रकृती इतकी नाजूक झाली होती, की आधाराशिवाय त्यांना चालणं तर सोडाच पण उठणं बसणंही शक्य नव्हते. पण इतकं असूनही मी त्यांना नागपूरच्या धर्मांतराच्या कार्यक्रमासाठी उत्तेजित न करते, तर ते ऐतिहासिक महान कार्य त्यांच्या हातून कधीच होते ना, याची नम्रतापूर्वक नोंद करणे आवश्यक आहे. आमच्या ९ वर्षांच्या सहजीवनात आम्ही सदैव बुद्धिवादाकडे झुकलेलो असल्याने संसारातील दुसऱ्या लौकिक व आगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यास आम्हाला वेळच नव्हता. त्यांची माझ्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती नव्हती. त्यांचा एक सिद्धांत होता की, जे काही करायचे ते पूर्ण विचार करून करावे. म्हणूनच आम्ही पूर्ण विचारांती बौद्ध धम्माचा स्वीकार केला.
Dr Savita Bhimrao Ambedkar | Vinimay Publication | Latest Edition | Marathi | Hardbound |
Share
