Akshargranth
Dusrya Jodidarachya Shodhat by Eva Heller
Dusrya Jodidarachya Shodhat by Eva Heller
Couldn't load pickup availability
Dusrya Jodidarachya Shodhat - दुस-या जोडीदाराच्या शोधात by Eva Heller, Translator - Vidyasagar Mahajan
बर्लिनमधल्या एका फिल्म अॅकॅडमीत शिकणारी कोन्स्टान्त्से वेख्सेलबुर्गर ही जर्मन तरुणी दुसऱ्या जोडीदाराच्या शोधात आहे. अल्बर्ट नावाच्या एका नवख्या डॉक्टरबरोबर ती स्वतःच्या सदनिकेत लग्न न करता काही वर्षे राहत आहे. पण तिच्या मते तो एक नंबरचा कंजूष आणि भावनिकदृष्ट्याही तुंबून बसलेला आहे. कोन्स्टान्त्से स्वतःला उच्च बौद्धिक स्तरावर वावरणारी आणि अतिशय क्रांतिकारी, राजकीय आणि सामाजिक भूमिका घेऊन जगणारी समजते. तिला मध्यमवर्गात प्रस्थापित झालेली कोंदट विवाहचौकट झुगारून द्यायची असते. स्त्रीचे उच्च बौद्धिक स्थान मानणाऱ्या सहजीवनाचे स्वप्न तिच्या डोळ्यांसमोर सतत तरळत असते. मात्र, जर्मन समाजात तिच्या आजूबाजूला तिच्या नजरेला काय पडते, तर विविध प्रकारे एकत्र राहणाऱ्या जोडप्यांमधल्या सहजीवनाची भ्रष्ट झालेली रूपे! मग उच्च सामाजिक, राजकीय जाणिवा दाखवणारा आपल्या कल्पनेतील पुरुष जोडीदार आपण कसा ओळखून काढायचा? असा कोणी भेटला तर खरेच सगळे सिद्धांत प्रत्यक्षात उतरतील का? उपरोधिक, तिरकस विनोदी शैलीत असंख्य प्रसंग, दाखले देत लिहिलेली, आत्मकेंद्रित, चंगळवादी समाजात जगणाऱ्या आणि तगणाऱ्या स्त्री-पुरुषांमधील नात्यांचा शोध घेणारी कादंबरी. मराठीसकट जगभरातील १९ भाषांत भाषांतरित झालेली बेस्ट सेलर जर्मन कादंबरी.
Eva Heller | Vidyasagar Mahajan | Manovikas Prakashan |
Share
