Akshargranth
Ek Adbhutramya Dantkatha by Narayan Dharap
Ek Adbhutramya Dantkatha by Narayan Dharap
Couldn't load pickup availability
एक अद्भुतरम्य दंतकथा…नारायण धारप
संपादक : डॉ. शिरीष धारप | विवेक सबनीस | अजिंक्य विश्वास
किं. रु ९५० प्रकाशनपूर्व सवलतीत रु ६७५ मध्ये
मराठी भयकथेचे आणि विज्ञानकथेचे अनभिषिक्त सम्राट नारायण धारप यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या साहित्यावर आणि व्यक्तिमत्त्वावर विविध कोनांतून टाकलेला प्रकाशझोत म्हणजे हा ग्रंथ !
या ग्रंथात स्वतः धारप यांनी त्यांच्या लेखनाबद्दल वेळोवेळी मांडलेली भूमिका, त्यांचे विचार, लेखनप्रक्रिया यांबद्दलचे लेख आणि मुलाखती यांचं संकलन करण्यात आलं आहे. तसंच शंकर सारडा, निरंजन घाटे, चित्रकार रविमुकुल, पंकज भोसले, हृषीकेश गुप्ते, गणेश मतकरी, सुभाष सावरकर, किरण क्षीरसागर आणि दीपा देशमुख यांसारख्या नव्या-जुन्या पिढीतील लेखकांनी धारपांच्या साहित्याबद्दल आपापले दृष्टिकोन यात मांडले आहेत. त्याचबरोबर कौटुंबिक जीवनात धारप . कसे होते याच्या हृद्य आठवणी त्यांच्या कुटुंबीयांनी जागवल्या आहेत.
ग्रंथातला आगळावेगळा, विशेष विभाग आहे त्यांच्या कथांचा! धारपांच्या सर्वोत्तम समजल्या गेलेल्या तीन कथा या ग्रंथात समाविष्ट केल्या असून वाचकांसाठी ते ‘सरप्राइज गिफ्ट’ ठरेल, हे निश्चित !
+ धारपांच्या ३ गाजलेल्या कथा
+ विशेष लेख, इ.
+ धारपांच्या मुलाखती
+ कथांवरील रेखाचित्रं
+ ९६ पुस्तकांची दुर्मीळ रंगीत मुखपृष्ठं
Share
