Akshargranth
Eka Kheliyane एका खेळियाने by Ashutosh Thatte
Eka Kheliyane एका खेळियाने by Ashutosh Thatte
सकाळ प्रकाशनाने सप्टेंबर, २०२२मध्ये घेतलेल्या लेखनस्पर्धेत 'ललित गद्य' या साहित्यप्रकारासाठी पुरस्कृत केले गेलेले आशुतोष थत्ते लिखित पुस्तक एका खेळियाने.
वेगवेगळ्या खेळांतील नवी-जुनी-प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे, त्यांचे गुण-दोष, यश-अपयश रेखाटणारे काही लेख. काही रोमहर्षक सामन्यांच्या कहाण्या तर काही 'खेळभावने'वरील लेख.
आशुतोष आजच्या तरुणाईच्या भाषेत लिहितात, त्या विशिष्ट खेळाशी संबंधित इंग्लिश-हिंदी-पंजाबी शब्द, साहित्य-नाटक-सिनेमा-ओटीटी सिरियल्समधील प्रसिद्ध वाक्ये-संवाद, लोकप्रिय गाण्यांचे मुखडे त्यांच्या लेखनात सहज येतात, त्यांची शैली कधी गोष्ट सांगितल्यासारखी, कधी काव्यात्म, तर कधी चिंतनशील,
रसाळ, ओघवत्या आणि प्रभावी निवेदनातून खेळ, खेळाडू, स्पर्धा, माहोल नजरेसमोर उभा करण्याचे कसब त्यांच्याकडे आहे; कारण त्यांनी तो अनुभव तसा रसरसून घेतला आहे.
देश, भाषा, वंश, धर्म, लिंग यांच्या पलीकडे जाऊन, खेळावर, खेळाडूंवर मनस्वी प्रेम करणाऱ्या आणि खेळभावना मनी जपणाऱ्या नव्या दमाच्या लेखकाचे पुस्तक एका खेळियाने
Ashutosh Thatte | Sakal Prakashan | Language - Marathi |