Akshargranth
Eklavya by Vijay Devade एकलव्य
Eklavya by Vijay Devade एकलव्य
Couldn't load pickup availability
Eklavya by Vijay Devade एकलव्य | Price 380/- | Offer Price 340/- limited Stock Hurry up!
दुमदुमत्या आसमंताला निठेपुढं झुकायला लावणारा, स्वअध्ययनान धनुर्विद्या मिळवणारा, कुळभेदाच्या जाचक भिंतींना तोडून सर्वश्रेष्ठ धनुर्धर होणारा निषाधराजा एकलव्य !
महाभारतातलं असं एक पात्र जे कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये असतं तर त्या युद्धाचं चित्र कदाचित बदललं गेलं असतं. एकलव्यानं गुरुदक्षिणेत अंगठा गुरू द्रोणाचार्य यांना दिला, त्याच्या निष्ठेनं सर्वांना भुरळ घातली. अशी गुरुदक्षिणा देऊन साहस, त्याग, निष्ठा व समर्पणाच्या जोरावर परत पर्वतासारखा उभा राहून एकलव्यानं आदर्श निर्माण केला.
भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात फक्त आवाजाच्या दिशेनं बाण मारून लक्ष्यवेध करणारा एकलव्य बाणावर इतकं नियंत्रण असणारा महाभारतातला एकमेव धनुर्धर म्हणजे एकलव्य! तो एक बुद्धिमंत हुशार राजा होता, त्यांनीही अनेक युद्ध लढली. युद्धात कृष्णालाही नमायला लावणारा तो एक शक्तिशाली धनुर्धर आणि योद्धा होता.
एकलव्य ही कादंबरी वाचल्यावर आपल्या मनाजवळ असलेला राजा.
एकलव्य आपल्याला निश्चित सापडेल.
Share
