Skip to product information
1 of 1

Akshargranth

Gaichya Navan Changbhala गाईच्या नावानं चांगभलं By Shruti Ganapatye

Gaichya Navan Changbhala गाईच्या नावानं चांगभलं By Shruti Ganapatye

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

गाईविषयी आपुलकी भारतासाठी नवीन नाही. मात्र २०१४ सालानंतर गोमांस बंदी, झुंडबळी, गाईच्या नावाने हिंसाचार वाढत गेला आणि ‘गाय’ या शब्दाने देशात एक दहशत निर्माण केली. गाईचा दर्जा मातेपासून दैवपदापर्यंत पोहोचला आणि तिला वाचवण्यासाठी स्वयंघोषित गोरक्षकांच्या फौजा जागोजागी उभ्या राहिल्या. त्यांनी कायदा हातात घेऊन गाईच्या नावाने अल्पसंख्याक आणि उपेक्षित समुदायांना लक्ष्य केलं. गोरक्षा चळवळ हा विषय देशासाठी इतका महत्त्वाचा झाला की, गरिबी, भूक, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी अशा देशातल्या प्रमुख समस्याही त्यापुढे मागे पडल्या. या पार्श्वभूमीवर ‘गाईच्या नावानं चांगभलं’ हे पुस्तक गोरक्षा चळवळीमागचं राजकारण आणि या चळवळीचा सामाजिक- आर्थिक परिणाम उलगडून सांगतं. गाईच्या नावाने सध्या तापलेलं वातावरण हे अचानक उद्भवलेलं नसून त्यामागे एक मोठा इतिहास आहे. गोरक्षा चळवळीची मुळं ही १९व्या शतकातल्या ‘हिंदू राष्ट्रवादा’मध्ये सापडतात. त्यामुळेच या चळवळीचा हेतू हा हिंदू धर्मापेक्षा हिंदुत्वाच्या राजकारणाशी अधिक निगडित आहे. गोहत्या आणि गोमांस बंदीशी संबंधित गुन्ह्यांबद्दल विविध स्त्रोतांकडून, माहितीच्या अधिकारातून संकलित केलेली माहिती वाचकांना स्वतः या विषयावर निष्कर्ष काढण्यासाठी मदत करेल, या चळवळीचा विविध उद्योगांवर झालेला आर्थिक परिणाम यातील फोलपणा दाखवून देतो. भारतात १५० वर्षांची परंपरा असलेली ही गोरक्षा चळवळ खरोखरच गाय वाचवण्यासाठी उपयुक्त ठरली आहे का, याचं उत्तर नकारार्थी येतं. उलट ही चळवळ अशीच सुरू राहिली तर गुरं नष्टही होऊ शकतात, असा इशाराच प्राणिगणनेच्या आकडेवारीतून मिळतो. एकजिनसीपणाच्या नावाखाली गोमांस बंदी घालून, उच्च जातींचा शाकाहार सर्वावर लादून आपली वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती धोक्यात आणण्याचा प्रयत्न अनेक प्रश्न निर्माण करतो. गोहत्या बंदी चळवळ आणि गोमांस बंदीच्या समर्थनासाठी गेल्या १० वर्षांमध्ये करण्यात आलेले दावे प्रत्यक्षात खरे ठरतात की फोल ठरतात याचे उत्तर सविस्तर संशोधन, निरीक्षण आणि उद्बोधक चर्चेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केला आहे.

Shruti Ganapatye | Lokvangmay Grih Prakashan | Latest edition | Marathi | Paperback |

View full details