Akshargranth
Gandharvanche Dene by Atul Deulgaonkar गंधर्वांचे देणे - अतुल देऊळगावकर
Gandharvanche Dene by Atul Deulgaonkar गंधर्वांचे देणे - अतुल देऊळगावकर
Couldn't load pickup availability
‘गंधर्वांचे देणे – पं. कुमारजींशी संवाद’, संपादन- अतुल देऊळगावकर Gandharvanche Dene गंधर्वांचे देणे by Atul Deulgaonkar
कुमारजींचा सांगीतिक विचार - प्रज्ञावंत गायक पं. कुमार गंधर्व यांचा भाषा, साहित्य व संगीताचा गाढा अभ्यास होता. हा अभिजात ऐवज अतुल देऊळगावकर यांनी संपादित केलेल्या ‘गंधर्वांचे देणे पं. कुमारजींशी संवाद’ या पुस्तकाच्या रूपात उपलब्ध होत आहे.
या पुस्तकाला तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांची प्रस्तावना लाभली असून, पुस्तकाचे प्रकाशन ४ एप्रिलला मुंबईत होत आहे.
BOOK YOUR COPY !
कुमारजींनी या संवादसत्रांतून स्वर-लय-ताल, रागसंगीत व त्यातील प्रकार, संगीतातील घराणी, ऋतुसंगीत व लोकसंगीताचा पैस, त्यांनी ऐकलेले, पाहिलेले गाणे व त्यांचे गाणे यांवर सविस्तर मांडणी केली होती. यातील विचारांच्या पुष्ट्यर्थ त्यांचे जवळजवळ ५ तासांचे गायन या ग्रंथात दिलेल्या QR कोड्सद्वारे ऐकता येते. या ग्रंथाद्वारे कुमारजींना साक्षात भेटण्याचा प्रत्यय येतो. कुमारजींच्या सरत आलेल्या शताब्दी वर्षातील ही सर्वाधिक महत्त्वाची आणि फार मोठी ऐतिहासिक घटना आहे.
Atul Deulgaonkar | Granthali Prakashan | New Edition | Marathi |
Share
