Akshargranth
Gautam Buddhanche Charitra Bhagwan Buddha Books in Marathi
Gautam Buddhanche Charitra Bhagwan Buddha Books in Marathi
Gautam Buddhanche Charitra, Bhagwan Buddha Books in Marathi, Budha Biography Book गौतम बुद्ध चरित्र मराठी पुस्तक | Saket Prakashan Books |
“दादा केळूसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयातसुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
या चरित्रग्रंथात गौतम बुद्धांबद्दलचा भाबडा आदर कुठेही दिसून येत नाही. त्याऐवजी एक प्रकारचे ज्ञानोत्तर भारावलेपण मात्र या ग्रंथात व्यक्त झाले आहे. या भारावलेपणामुळेच हा ग्रंथ कमालीच्या ओघवत्या भाषेत प्रकट झालेला आहे. प्रस्तुत चरित्रग्रंथ जास्तीत जास्त मराठी वाचकांनी अवश्य वाचायला हवा.
धर्मशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, शिक्षणशास्त्र या चौफेर विषयांतील ते पंडित होते. महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ आणि मराठा ऐक्येच्छू सभेसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. ते गीता आणि बौद्ध धर्माचे भाष्यकार होते.
पुरोगामी महाराष्ट्राने केळूसकरांच्या एकूण लेखनाची म्हणावी तशी दखल घेतली नाही.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी जशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुण हेरून मदत केली तशीच मदत केळूसकरांनाही केली. गायकवाड ओरिएंटल सिरीजमध्ये ‘गौतम बुद्धांचे चरित्र’ हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यामुळेच पहिल्यांदा गौतम बुद्धांची ओळख ठळकपणे मराठी वाचकांस झाली.
Krishnarao Arjun Keluskar | Saket Prakashan | Latest New Edition | Marathi | Paperback |