Akshargranth
Hindu by Bhalchandra Nemade
Hindu by Bhalchandra Nemade
Couldn't load pickup availability
हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ – भालचंद्र नेमाडे
वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञ यांनी मांडलेल्या तात्त्विक विचारधारांमुळे यात नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. संस्कृतीची मूळ बैठक कायम राहिली तरी येणारी प्रत्येक नवीन विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली आणि रूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, चालीरीती, परस्पर नातेसंबंध, कुटुंबव्यवस्था यांचा एक पट निर्माण होत गेला. शतकानुशतके या संस्कृतीने माणसाचे अवघे जीवन व्यापून टाकले. या संस्कृतीचा सगळा पसारा, अनेक चांगल्या-वाईट गोष्टींची ही अडगळच माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते. म्हणूनच ही ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ असे भालचंद्र नेमाडे यांनी म्हटले आहे. या ‘समृद्ध अडगळी’चे चकित करून सोडणारे सुरम्य दर्शन ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीतून घडते.
Bhalchandra Nemade |Popular Prakashan |
Share
