Akshargranth
Hindutva हिंदुत्व by Prabodhankar Thakare
Hindutva हिंदुत्व by Prabodhankar Thakare
Couldn't load pickup availability
Hindutva हिंदुत्व by Prabodhankar Thakare
आजच्या महाराष्ट्राचा पाया विसाव्या शतकाच्या आरंभी घातला गेला आहे, तेव्हा महाराष्ट्राला वळण लावणाऱ्यांमध्ये थोर विचारवंत, लेखक, संपादक, नाटककार, इतिहासकार, सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे प्रणेते, संयुक्त महाराष्ट्राचे नेते व शिवसेनेचे मूळ प्रेरणास्थान प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे नाव अग्रस्थानी घेणे उचित ठरेल. प्रबोधनकार ठाकरे यांनी जात-धर्माच्या नावाने द्वेष पसरवणाऱ्या तसेच हिंदू समाजातील अस्पृश्यता अंधश्रद्धा, हुंडा, बालविवाह यांसह अनेक रूढी-परंपरांना कायम विरोध केला. हिंदू समाज सुधारावयाचा असेल तर रूढी-परंपरा यांत सुधारणा करावीच लागेल, असे त्यांचे ठाम मत होते, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी समाजात बदल तर घडवलाच, परंतु पुढील पिढ्यावरही आपला ठसा उमटवला. त्यांनी धार्मिकतेच्या अर्थाला नवीन दृष्टिकोन दिला, त्यामुळे आजही त्यांच्या विचारांना महत्त्व आहे.
New Era Publishing |
Share
