Akshargranth
HOLLYWOODCHE VINODVEER by RAJENDRA KHER
HOLLYWOODCHE VINODVEER by RAJENDRA KHER
Couldn't load pickup availability
HOLLYWOODCHE VINODVEER by RAJENDRA KHER - हॉलिवूडचे विनोदवीर - राजेन्द्र खेर
राजेन्द्र खेर लिखित ‘हॉलिवूडचे विनोदवीर ‘ या पुस्तकात हॉलिवूडच्या माध्यमातून जगभरातील रसिकांची मनमुराद करमणूक केलेल्या आठ विनोदवीरांची चरितकहाणी आहे. प्रसिद्धी-नावलौकिक सहजासहजी किंवा अनायासे मिळत नाही. त्यासाठी जन्मत:च अभिजात कलागुण अंगी असावे लागतात. या प्रत्येकाची शैली वेगवेगळी असली... तरी प्रेक्षकांची हसवणूक हाच या विनोदवीरांचा एकमेव धर्म होता. यातील बहुतेकांनी सुरुवातीला मिळेल त्या संधीचं सोनं करत या क्षेत्रात पाय रोवला... त्यांच्या दुर्दम्य ध्यासाला अडथळे-अडचणींची पर्वा नव्हती. उलट विपरीत परिस्थितीने त्यांच्यातील कलागुणांना अलौकिक झळाळी प्राप्त करून दिली. मूकपटाचा काळ त्यांनी गाजवला तसाच बोलपटाचा काळही... हॉलिवूडला लाभलेली ही रत्नंच होती. त्यांच्या कारकिर्दीची ओळख सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. आवर्जून वाचावे असेच हे पुस्तक आहे.
Rajendra Kher | Mehta Publishing House |
Share
