Akshargranth
Intraday Trading by Indrazith Shantharaj इंट्राडे ट्रेडिंग
Intraday Trading by Indrazith Shantharaj इंट्राडे ट्रेडिंग
Couldn't load pickup availability
इंट्राडे ट्रेडिंग - Indrazith Shantharaj, Translator by Jui Palekar-Paralikar
इंट्राडे ट्रेडिंगबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि भारतीय स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी व्हा!
बहुतेक लोकांसाठी इंट्राडे ट्रेडिंग ही एक अनोखी आणि रहस्यमय कार्यपद्धती आहे. यू ट्यूबवर चालणारे आणि ताबडतोब नफा कसा मिळवावा हे सांगणारे इंट्राडे ट्रेडिंग या विषयावरील व्हिडिओज फारच लोकप्रिय आहेत. कोणत्याही व्यक्तीला ‘इंट्राडे ट्रेडिंग’ हा शब्द ऐकताच त्याच्या मनात उभा राहणारा पहिला शब्द कोणता असे विचारले तर, बहुतेकजण एकतर ‘पैसे’ किंवा ‘भीती’ हा शब्द सांगतील.
खरोखरच जर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये पैसे कमवणे इतके सोपे असते तर प्रत्येकाने त्यातून पैसे कमवले असते. इथे यशस्वी व्हायचे असेल तर सुयोग्य कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. कारण, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये योग्य स्टॉक्सची निवड करणे महत्त्वाचे असते. एखादी लहानशी चूक अवघ्या काही तासांतच मोठे नुकसान घडवून आणू शकते. त्याउलट योग्य स्टॉक्सची निवड केली तर सरासरी आरओआयपेक्षा अधिक कमाई करता येते हे खरे आहे. त्याकरिता इंट्राडे ट्रेडिंगच्या रणनीती समजून घेऊन केलेले व्यवहार अधिक फायदेशीर ठरतात.
Indrazith Shantharaj | Saket Prakashan | New Edition | Marathi | Paperback | Pages 176 |
Share
