1
/
of
1
Akshargranth
J. Krishnamurthy che Shikwan जे कृष्णमूर्तींची शिकवण
J. Krishnamurthy che Shikwan जे कृष्णमूर्तींची शिकवण
Regular price
Rs. 456.00
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 456.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
J. Krishnamurthy che Shikwan जे कृष्णमूर्तींची शिकवण by Dr Kamlesh Soman
जे. कृष्णमूर्ती यांचे संपूर्ण आयुष्य आणि त्यांची शिकवण यांनी २०व्या शतकाचा फार मोठा भाग व्यापलेला आहे. अर्वाचीन काळातील मानवी चेतनेवर त्यांच्या शिकवणूकीचा फार मोठा प्रभाव पडलेला दिसतो. कृष्णमूर्तीच्या शिकवणूकीत अतिशय दुर्मिळ अशी करुणा व विचारांची स्पष्टता आहे. इतकेच नव्हे तर, समोरच्याची वेदना-तडफड बरे करण्याची शक्ती त्यात निश्चितपणे आहे. मुख्य म्हणजे त्यातील शब्द व विचार कमालीचे प्रवाही आहेत. या दैनंदिनी-चिंतनिकेतून जे. कृष्णमूर्तीची शिकवण किती प्रगल्भ व परिपक्क आहे, याची तुम्हाला कल्पना येऊ शकेल !
कृष्णमूतींची शिकवण परिपूर्ण असून, ती मानवी अस्तित्त्वालाच व्यापून उरते. शारीरिक स्तरांपासून खोल माणसाच्या अंतर्यामापर्यंत समग्र मानवी जीवनाचा यात अंतर्भाव होतो. रोजच्या जीवनातील समस्यांना सामोरे जायला, ही शिकवणच आपल्याला सर्वतोपरी सहाय्यभूत ठरणार आहे. कृष्णमूर्ती विचारधारेच्या दिव्यत्त्वाच्या प्रकाशात जीवनाचे अंतरबाह्य विकसन परिवर्तन सहज घडू शकते.
कृष्णमूर्तीच्या शिकवणूकीच्या आरशात आपण जे आहे ते परावर्तित होताना सहज पाहू शकतो! यातही ही शिकवणूक आपल्या आतील प्रत्यक्ष जीवन-वास्तवाच्या आकलनास निश्चितपणे सहाय्यभूत ठरते, ठरू शकते ही शिकवणूक आपण प्रत्यक्ष जगलो तर एक क्षितिजरहित अवस्था आपल्याला प्राप्त होईल आणि ती कालातीत व कोणत्याही मर्यादशिवाय असेल, असा कृष्णमूर्तीचा सांगावा आहे.
प्रस्तुत ग्रंथाच्या निमित्ताने जे. कृष्णमूर्तीची शिकवण तुम्ही दैनंदिनीच्या-चिंतनिकेच्या स्वरुपात अनभवू शकाल ! अर्थात त्यासाठी ग्रंथासोबत एकत्रित संवाद करीत प्रवास करणे महत्त्वाचे आहे. जे. कृष्णमूर्तीच्या शिकवणूकीचे सारच एक नव्या मांडणीत संकलित-संपादित करण्याचा अल्पसा-नम्न प्रयत्न या पुस्तकाल करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रंथाचे सारे श्रेय जे. कृष्णमूर्तीचेच आहे, मी फक्त निमित्तमात्र !
डॉ. कमलेश सोमण
Share
