Akshargranth
Jagala Pokharnari Davi Valvi जगाला पोखरणारी डावी वाळवी by Abhijit Jog अभिजित जोग
Jagala Pokharnari Davi Valvi जगाला पोखरणारी डावी वाळवी by Abhijit Jog अभिजित जोग
Couldn't load pickup availability
Jagala Pokharnari Davi Valvi जगाला पोखरणारी डावी वाळवी by Abhijit Jog अभिजित जोग Offer Price
Dilipraj Prakashan Pvt Ltd, Abhijit Jog,2023,
Pages 304, Marathi,Paperback, 9789394646902
बंदुकीच्या नळीतून येणारी रक्तरंजित क्रांती अशक्य आहे हे ओळखून डाव्या शक्तींनी जागतिक वर्चस्वाचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नवी घातक रणनीती आखली, जिचं उद्दिष्ट होतं पाश्चात्य जगताची कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम यासारखी शक्तिस्थान॔ आतून पोखरून टाकत त्यांचा विध्वंस करणं. यासाठी त्यांनी अतिरेकी व्यक्तिवाद, विकृत स्वरूपातील स्त्रीवाद, लैंगिक स्वैराचार, समलैंगिकतेचा प्रसार, इतिहासाचं विकृतीकरण, धर्म आणि संस्कृतीची कुचेष्टा, अनिर्बंध स्थलांतराला प्रोत्साहन... यांचा आधार घेत कुटुंब, समाज, राष्ट्र यांना स्वयंविध्वंसाच्या टोकावर आणून उभं केलं. मार्क्सवादातील श्रीमंत वि. गरीब हा मूळ आर्थिक संघर्ष दूर ठेऊन वंश, लिंग, धर्म या सांस्कृतिक आधारांवर विविध गटांमध्ये सतत संघर्ष भडकत राहील अशी योजना राबवली. विशेष म्हणजे आपला विध्वंसक अजेंडा राबवण्यासाठी सामाजिक न्याय, पर्यावरणवाद, स्त्रीमुक्ती, सर्वसमावेशकता हे आकर्षक मुखवटे धारण केल्यामुळे त्यांना विरोध करणंच अशक्य ठरू लागलं. या नवमार्क्सवादाने म्हणजेच वोकिझमने आता भारताकडे लक्ष वळवलं आहे. मूळ मार्क्सवादाच्या समोर दिसणार्या बंदुकीशी लढणं शक्य होतं पण आपल्याच लोकांचा बुद्धिभेद करून आतून पोखरणार्या या वाळवीला आवरणं फारच कठीण आहे. म्हणून इतरांच्या अनुभवावरून आजच जागं व्हायला हवं. आकर्षक मुखवट्यांमागचा हा भेसूर, विध्वंसक चेहरा वेळीच ओळखायला हवा.
Share
