Skip to product information
1 of 1

Akshargranth

Kalandar कलंदर- श्री. ना. पेंडसे S. N. Pendse

Kalandar कलंदर- श्री. ना. पेंडसे S. N. Pendse

Regular price Rs. 540.00
Regular price Rs. 600.00 Sale price Rs. 540.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

`हत्या’ कादंबरीचा `कलंदर’ हा पुढील भाग; - पण किती तरी वेगळा. `हत्या’तील आत्मकथनाची शैलीच केवळ इथे बदलली आहे, असे नाही, तर पेंडसे यांच्या कलेने आपल्या विकासाचा पुढील टप्पा गाठला आहे. निसर्ग येथे कथेच्या भावगुणाशी एकजीव आणि म्हणून अधिक समृद्ध झाला आहे; व्यक्तिचित्रणाचे सामर्थ्य तसेच रसरशीत आहे. पण ते अधिक विविध रूपे धारण करते आहे; कथानकाची गुंफण अधिक सूक्ष्म आणि म्हणून अधिक वेधक झाली आहे. `एल्गार’, `हद्दपार’, `गारंबीचा बापू’, `हत्या’ या आपल्या पूर्वीच्या कादंबर्‍यांत पेंडसे यांनी रंगविलेले जीवनाचे चित्र अधिकाधिक सूक्ष्म व संमिश्र होत गेले आहे.

`कलंदर’मध्ये तर पाश्चात्त्य संगीतातील अनेक वाद्यांच्या स्वरमेळाची आठवण व्हावी, इतके ते संमिश्र, चढते आणि अनेक बिंदूभोवती पुंजी घालूनही एका केंद्राकडे झेप घेणारे व अनेक पातळ्यांवर विकास पावूनदेखील एकात्म व सुसंवादी आहे.

S N Pendse | Majestic Prakashan | Latest Edition | Language - Marathi | Paperback | Pages 403 |

View full details