Akshargranth
Kari The Elephant by Dhan Gopal Mukerji, Mukund Vaze
Kari The Elephant by Dhan Gopal Mukerji, Mukund Vaze
Couldn't load pickup availability
Kari The Elephant | Dhan Gopal Mukerji Translated By : Mukund Vaze कारी द एलिफंट । धन गोपाल मुकर्जी अनुवाद : मुकुंद वझे
हिंदुस्तानातील ज्या लेखकांनी अमेरिकेत नाव कमावले अशा पहिल्या
लेखकांपैकी एक म्हणजे धन गोपाल मुकर्जी. कारी द एलिफंट मधील
कारी, हा माणसांसारखा वागत नाही, तो हत्तींसारखाच वागतो. कारी हा
जसा वास्तवरूपात उभा केला आहे तसेच हिंदुस्तानातील जंगलही खरे
खुरे उभे केले आहे- भयकारक म्हणून मान द्यावा आणि त्याच वेळी आदराने
मान झुकवावी असे- “ शांततेचे निवासस्थान, शांतता म्हणजे ईश्वराचा आवाज.
कोणताच मानव त्याला विचलित करू इच्छित नाही.”
- Perry Whitford यांनी केलेले कारी द एलिफंटचे परीक्षण - 9/5/1927.
हत्ती आणि माणूस, हत्ती आणि माकड, माणूस आणि माकड ; या तिघांचं
एकमेकांशी नातं काय असतं? वेगवेगळं आणि एकत्र आल्यावर? या
गोष्टींचा एका बालकाने घेतलेला वेध म्हणजे ‘कारी द एलिफंट.’
आपल्या सर्वांसह या प्राणी-त्रिकुटांच्या जंगलाशी असलेल्या नात्याचा
वेधक पट या अल्पाक्षरी पुस्तकात उलगडतो. हत्ती, माकड आणि इतर
अनेक वन्य प्राणी यांच्याबद्दलचे कुतूहल हे पुस्तक शमविते. त्याचबरोबर
ब्रिटिश सत्ता हिंदुस्तानात पूर्ण भरात असताना, सत्ताधाऱ्यांच्या मर्यादा मुकर्जी
थोडक्यात पण अतिशय प्रभावीपणे दाखवून देतात. जंगलाची व त्यात झालेल्या
निसर्गाच्या सौंदर्याची वर्णने मुकर्जी करतात तेव्हा मुलतः ते कवी होते हे
निखालसपणे ठसते.
Manovikas Prakashan |
Share
