Skip to product information
1 of 1

Akshargranth

Keralmadhil Samajik Chalval Aani Dalit Sahitya केरळमधील सामाजिक चळवळ आणि दलित साहित्य

Keralmadhil Samajik Chalval Aani Dalit Sahitya केरळमधील सामाजिक चळवळ आणि दलित साहित्य

Regular price Rs. 450.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 450.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Keralmadhil Samajik Chalval Aani Dalit Sahitya by Bajrang Bihari Tiwari , Aravind Surwade  केरळमधील सामाजिक चळवळ आणि दलित साहित्य - बजरंग बिहारी तिवारी ,अरविंद सुरवाडे 

भारतातील इतर राज्यांच्या तुलनेने केरळ हे सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असे राज्य आहे. दलितांच्या सामाजिक-सांस्कृतिक चळवळींच्या माध्यमातूनच तिथे राजकीय चळवळ आकाराला येत गेली आणि नव्या राज्याच्या पहिल्या निवडणुकीतून कम्युनिस्ट पक्षाचे सरकार स्थापन झाले. या सरकारची ध्येय-धोरणे काय होती? कम्युनिस्ट पक्षाच्या ध्येय-धोरणांची अंमलबजावणी करण्यात हे सरकार कितपत यशस्वी ठरले? पक्षाच्या ध्येय- धोरणांचा आणि कार्यक्रमांचा दलित जनतेवर काय परिणाम झाला? त्यानंतरची इतर पक्षांची सरकारे आणि परिवर्तन विरोधी शक्तींनी क्रांतीचे चक्र कसे अवरुद्ध करण्याचा प्रयत्न केला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला १८०० ते २०१० या कालावधीतील केरळच्या इतिहासाला कवेत घेणाऱ्या बजरंग बिहारी तिवारी यांच्या प्रस्तुत ग्रंथात मिळतील. मल्याळम दलित साहित्याची प्रकृती आणि प्रवृत्ती यांचं गंभीर विवेचन हे देखील या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. विविध वाङ्मयप्रकारांच्या माध्यमातून मल्याळम दलित साहित्याचा विकासक्रम या ग्रंथात चित्रित केलेला आहे. लेखकाची प्रामाणिक संशोधनदृष्टी लक्षात घेता सामाजिक चळवळींची समकाळातील अवरुद्धता भेदण्यास हा ग्रंथ निश्चितच उपयोगी ठरेल.

View full details