Akshargranth
Khajina by Madhuri Purandare खजिना - माधुरी पुरंदरे
Khajina by Madhuri Purandare खजिना - माधुरी पुरंदरे
Couldn't load pickup availability
खजिना
चुटकीच्या बाबाला कोकणातल्या वाड्यात सापडलेल्या खजिन्याचं गुपित शेवटी शाळेत कळलंच.
मग शाळेने बाबावर वर्गाच्या रंगाची जबाबदारी सोपवली आणि बाबाने ती पारही पाडली,
पण खरी गोष्ट माहीत झाल्यावर सगळे आपल्याला रागावतील या भीतीने
चुटकीला मात्र चैन पडेना...
खऱ्याखुऱ्या खजिन्याची एक धमाल गोष्ट.
पाचवडेकरांचा डच्चू
पाचवडेकरांच्या मेघनचा लाडका कुत्रा डच्चू...
डच्चू आणि मेघन यांना एकमेकांशिवाय करमतच नसे.
पण मेघनकडे लव्हबर्ड आल्यावर डच्चूकडे दुर्लक्ष होऊ लागतं.
पुढे तर एक नवीनच प्रश्न निर्माण होतो. मेघन एका स्पर्धेत भाग घेतो आणि
त्याच्या अफलातून चित्राला मिळालेल्या बक्षिसापायी घरावर एक अभूतपूर्व संकट कोसळतं.
आता डच्चू अगदीच बिचारा होऊन जातो...
टॉवेल उडाला भुर्रर्रर्र!!
बरेचदा कल्पनांच्या विश्वात वावरणारा परम एकदा अंघोळ झाल्या झाल्या बाल्कनीत येतो आणि....
Madhuri Purandare | Jyotsna Prakashan |
Share
