Akshargranth
Khulbhar Dudhachi Kahani by Sunanda Amrapurkar खुलभर दुधाची कहाणी
Khulbhar Dudhachi Kahani by Sunanda Amrapurkar खुलभर दुधाची कहाणी
Couldn't load pickup availability
"अमरापूरकर हे नाव ऐकलं की लगेच चित्रपटांच्या रुपेरी पडद्यावरचा एक चेहरा नजरेसमोर अवतरतो. अर्थातच सदाशिव अमरापूरकर यांचा. एकीकडे हा दिग्गज अभिनेता आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीवर ठसा उमटवत होता, तर त्याच वेळी कौटुंबिक पातळीवर त्यांची सहचारिणी सगळ्या ताळमेळाचं नेमकं गणित मांडत होती. म्हटलं तर ती खुलभर दुधाची कहाणी आणि म्हटलं तर एका दीर्घ प्रवासाचा नितळ पट. ज्यात सुनंदा अमरापूरकर आपल्या जीवनपटाची छोटी छोटी क्षणचित्रे असोशीने जगतात. वडिलांच्या अकाली निधनामुळे सोसावे लागलेले दारिद्र्याचे चटके...शैक्षणिक प्रवास...नाटकातूनच सदाशिव अमरापूरकरांशी जुळलेले सूर आणि नंतर त्यांच्याशी झालेला विवाह...विवाहोत्तर जीवन...असा हा पट. पतीच्या प्रसिद्धीच्या वलयापासून स्वतःला दूर ठेवून त्यांनी एका कलावंताला आवश्यक असणारा अवकाश जोपासला. त्याच वेळी साऱ्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या. स्वतः नाटकात काम करण्याची क्षमता असूनही नवऱ्याचं कलावंतपण जोपासण्यासाठी इच्छेला मुरड घातली. सदाशिव अमरापूरकरांच्या करिअरसाठी मुंबईला केलेलं स्थलांतर असो वा दोन शहरातला, नातेसंबंधातला आपुलकीचा धागा कायम जोपासणं असो, सुनंता अमरापूरकरांनी सगळं अढळ श्रद्धेनं केलं. सोबत अनुवादाच्या क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवला. त्यामुळंच त्यांचं हे आत्मकथन निष्ठेनं संसाराची सूत्रे चालवणाऱ्या खमक्या स्त्रीचं चरित्र वाटतं. माणसांनी, छोट्या-मोठ्या घटना-प्रसंगांनी गजबजलेलं बहुआयामी आणि हृदयस्पर्शी आत्मकथन...
Sunanda Amrapurkar | Mehta Publishing House | Latest Edition | Language - Marathi | Paperback | Pages 408 |
Share
