Skip to product information
1 of 1

Akshargranth

Kokanatil Dalitanche Ritirivaj Ani Lokgite by Urmila Pawar

Kokanatil Dalitanche Ritirivaj Ani Lokgite by Urmila Pawar

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Kokanatil Dalitanche Ritirivaj Ani Lokgite by Urmila Pawar - कोकणातील दलितांचे रीतिरिवाज आणि लोकगीते – उर्मिला पवार

मराठी साहित्यात दलितांचे आत्मकथन आणि स्त्रियांची आत्मचरित्रे ही दोन्ही अत्यंत समृद्ध दालने आहेत. उर्मिला पवार यांचे ‘आयदान’ हे आत्मकथन स्वतंत्रपणे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. मानवी जीवनातील सूक्ष्मातिसूक्ष्म पैलूंचा वेध घेणे हे जर साहित्याचे मुख्य वैशिष्ट्य असेल तर ‘आयदान’ हे एक अर्थपूर्ण असे प्रतीक आहे.

उर्मिला पवार यांचे कथावाङ्मय, त्यांचे आत्मकथन आणि वेळोवेळी त्यांनी दिलेली व्याख्याने यांचा मी चाहता आहे. ‘कोकणातील दलितांचे रीतिरिवाज आणि लोकगीते’ या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे की त्यात त्यांनी निव्वळ संकलन न करता त्यात कोकणाचा इतिहास, भूगोल, जीवनपद्धती आणि भाषा या सर्वांशी असलेला दाखवून दिला आहे. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र या सर्वच विद्याशाखेतील अभ्यासकांना या पुस्तकात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडतील. म्हणूनच या संशोधनपर लेखनाला त्यांच्या स्वतंत्र लेखनाइतकेच महत्त्व आहे.. या संबंध कोकण, तेथील सामाजिक उतरंड, तेथील निरनिराळ्या बोलीभाषा यांबद्दलच्या निवेदनानंतर लेखिकेने बाळ जन्मल्यापासून ते जलदानापर्यंतच्या सर्व संस्कारांचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित रीतिरिवाज आणि लोकगीते यांचा आलेख या पुस्तकातून मांडला आहे. विविध समाजांत सामाजिक सणांचे महत्त्व वेगळे असते, त्यांचेही या ज्ञातींसाठी असलेले महत्त्व उर्मिला पवार यांनी सांगितले आहे. या ग्रंथात दिलेली परिशिष्टे अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे म्हणी, वाक्प्रचार, उखाणे यांच्याविषयीची दुर्मीळ माहिती मिळते.

नवबौद्धांच्या सामाजिक परिवर्तनाचा हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.

– रामदास भटकळ

Urmila Pawar | Popular Prakashan | New Edition | Marathi | Paperback | Pages 196 |

View full details