Akshargranth
Kolhaal By Shwetal Parab कोल्हाळ - श्वेतल परब
Kolhaal By Shwetal Parab कोल्हाळ - श्वेतल परब
Couldn't load pickup availability
श्वेतल परब यांची ‘कोल्हाळ’ ही कादंबरी शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा विनाअनुदान धोरणावर सखोल आणि चिंतनपर मांडणी करते. शासन आणि स्वयंघोषित शिक्षणसम्राटांनी नफेखोर वृत्तीतून आपल्या शिक्षणसंस्थांमार्फत सुरू केलेल्या विनाअनुदानित शाळांमधून तुटपुंज्या वेतनावर काम करण्याची सक्ती करणारी व्यवस्था शिक्षकांचे अधःपतन करते. बेकारीच्या आवर्तात सापडलेल्या उच्चविद्याविभूषितांना आपल्या ऑक्टोपसी विळख्यात ओढून त्यांचे संपूर्ण आयुष्य सत्त्वहीन करून टाकणाऱ्या व्यवस्थेची कोल्हाळकृत्ये या कादंबरीत उजागर होतात. महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात जे विनाअनुदानित धोरण राबविले गेले त्याचे प्रत्यक्ष परिणाम, अध्ययन आणि अध्यापनाच्या चुकलेल्या धोरणाचा वास्तवदर्शी लेखाजोखा इथं येतो. हा अनुभवपट एका शिक्षिकेच्या नजरेतून आल्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंब यांची होणारी परवड अधोरेखित होतेच, शिवाय व्यवस्थेच्या पातळीवर गोष्टी कशा घडतात आणि कशा घडवल्या जातात याचं दाहक चित्रणही कादंबरी करते.
Share
