Akshargranth
Krishnakathavarun Sangali Te Mumbai कृष्णाकाठावरून (सांगली ते मुंबई)
Krishnakathavarun Sangali Te Mumbai कृष्णाकाठावरून (सांगली ते मुंबई)
Couldn't load pickup availability
Krishnakathavarun Sangali Te Mumbai by Mohan Deshmukh कृष्णाकाठावरून (सांगली ते मुंबई) - मोहन देशमुख
सांगली येथील एका छोट्या खेड्यातून मुंबईत आलेल्या मोहन देशमुख यांना नोकरी करायची की व्यवसाय असा प्रश्न पडला तेव्हा त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार याची त्यांना कल्पना होती. पुढे बांधकाम व्यवसायात स्थिरावल्यानंतरही त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. तशातही हा मराठी माणूस मुंबई महानगरीत घट्ट पाय रोवून खंबीरपणाने उभा राहिला आणि यशस्वी झाला. या काळातच राजकारणी, समाजकारणी, साहित्यिक आणि कलाकार अशा मंडळींचा दीर्घ सहवास त्यांना लाभला. बांधकामासारख्या रुक्ष क्षेत्रात असूनही संगीत, कला यात त्यांना रस राहिला. वाचनाची आवड जोपासली. सहकार्य आणि संवेदनशीलता यातून माणसे जोडली. विपश्यनासाधना आत्मसात करून मनाचे स्थैर्य मिळवले. व्यवसायात विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर कुठे थांबायचे याचा निर्णयही त्यांनी योग्यवेळी घेतला. उर्वरित आयुष्यात पर्यावरण, वृक्षारोपण आणि विपश्यना यासाठीच्या कामाचे नियोजनही त्यांनी केले. आपल्या आयुष्यातल्या विविध टप्प्यांवरील संघर्षाचा, सहजीवनाचा आणि स्वभानाचा त्यांनी या पुस्तकात मांडलेला हा सांगली ते मुंबई प्रवास... 'कृष्णाकाठावरून.'
Share
