Akshargranth
Kutuhalapoti - कुतूहलापोटी - Anil Awachat
Kutuhalapoti - कुतूहलापोटी - Anil Awachat
Couldn't load pickup availability
Kutuhalapoti by Anil Awachat | कुतूहलापोटी - अनिल अवचट
माणसाचा जन्म हे एक मोठे कुतूहल आहे. जन्मानंतरही अनेक गोष्टींबद्दल प्रश्न उभे राहतात. त्याबद्दल आश्चर्य वाटत राहते. लेखक, कलावंत अनिल अवचट यांनाही कित्येक गोष्टींबद्दल मनात प्रश्न निर्माण होतात. त्याचे उत्तर शोधण्याच्या ध्यासातून त्यांना खूप वेगळी, अद्भुत माहिती हाती येते. हीच माहिती त्यांनी 'कुतूहलापोटी'मधून वाचकांना सांगितली आहे.
साधारणपणे विषारी समजली जाणारी बुरशी परोपकारी कशी ठरते, याचे वर्णन करताना बुरशीचा इतिहास, भूगोलासह अत्यंत रंजक माहिती दिली आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, सापडणारा बॅक्टेरियाचा मागोवाही त्यांनी 'बॅक्टेरियाचे इन्फेक्शन' झाल्यासारखा घेतला आहे. कीटकविश्व, सापांची दुनिया, पक्षांच्या राज्यातील गमतीजमती उलगडून दाखविताना मधमाश्यांचे सहकार जीवनाचेही वर्णन केले आहे.
Anil Awachat | Samakalin Prakashan |
Share
