Skip to product information
1 of 1

Akshargranth

Lihoo Ya Binchook Marathi by Shripad Brahme And Neha Limaye लिहू या बिनचूक मराठी

Lihoo Ya Binchook Marathi by Shripad Brahme And Neha Limaye लिहू या बिनचूक मराठी

Regular price Rs. 140.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 140.00
-6% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Lihoo Ya Binchook Marathi by Shripad Brahme And Neha Limaye लिहू या बिनचूक मराठी

आपली मराठी भाषा जगातील समृध्द भाषांपैकी एक आहे. ‘अमृतातेंहि पैजा जिंकण्याचा’ विश्वास असलेली भाषा सुंदर आहे. मराठी मातीचा अस्सल दरवळ आपल्या भाषेच्या अक्षराअक्षरांतून झिरपत असतो. आपल्या विचाराम्च्या अभिव्यक्तीसाठी आपण हीच भाषालिखित स्वरूपात वापरतो. ती बिनचूक असेल तर वाचणार्‍यापर्यंत आपले म्हणणे अधिक नीटसपणे , नेमकेपणाने पोचू शकेल. अलीकडे आपल्या मराठी भाषेला इतर भाषांच्या प्रभावाचे, बेफिकीरपणाचे आणि ढोबळ चुकांचे ग्रहण लागले आहे, असे वाटते.काही साधे सोपे नियम जाणून घेतले आणि भाषेचा थोडा अभ्यास केला तर यातल्या अनेक चुका टाळता येऊ शकतील. मराठी लिहिणारे सर्व जण, मराठीचे विद्यार्थी, मराठी वृत्तपत्रांतील पत्रकार, जाहिरातलेखन करणारे संहितालेखक, वेगवेगळ्या दृकश्राव्य माध्यमांसाठी लेखन करणारे लेखक, एमपीएससी - यूपीएससीत भाषा विषय अभ्यासणारे विद्यार्थी , समाजमाध्यमांवर लिखाण करणारे सर्व हौशी लेखक या सर्वांना या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल. 

मराठी भाषेविषयी आपण आपली असेल नसेल तेवढी इंची छाती फुगवून ‘ लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ वगैरे म्हणत असतो. प्रत्यक्षात मात्र आपली ही मातृभाषा लिहीत असताना भरपूर चुका करत असतो, इंग्रजीचे एखादे स्पेलिंग असेल तर आपण घोकून घोकून पाठ करतो आणि बिनचूक लिहितो, पण मराठी भाषा लिहिताना मात्र १०० चुका करतो.

View full details