Akshargranth
Maafi Gen Z chi : Shapath Pruthvichi by Dr. Jagganath Patil
Maafi Gen Z chi : Shapath Pruthvichi by Dr. Jagganath Patil
Couldn't load pickup availability
आपल्याला पृथ्वीसाठी एक गाणं गायलं पाहिजे आणि ते गाणं अर्थातच हिरवं असलं पाहिजे. सभोवती गर्द झाडी, झुळझुळणारी नदी, खळाळणारे ओढे, कोसळणारे धबधबे आणि शेतात डोलणारी पिकं या सगळ्यांच्या सान्निध्यात या हिरव्या गाण्याची लकेर आसमंतात घुमली पाहिजे.
पण... ज्या काळात विकासाच्या नावाखाली झाडांची तोड सुरू आहे आणि पृथ्वीला ओसाड करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे, त्या काळात हे सगळं एखादं स्वप्न वाटू शकतं. मात्र कोणतीही गोष्ट साकार व्हायची असेल, तर आधी ती स्वप्नांत उभी राहतेच.
'माफी Gen Z ची : शपथ पृथ्वीची' या काव्यसंग्रहातील डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या कविता नव्या पिढीच्या मनात हिरव्या पृथ्वीचं स्वप्न पेरणाऱ्या कविता आहेत. म्हणूनच आजच्या काळात या कवितांचं मोल विशेषत्वाने जाणवतं.
आधीच्या पिढ्यांनी निसर्गाशी जो कृतघ्न व्यवहार केला, त्याबद्दल नव्या पिढीची माफी मागतानाच कवीने पृथ्वीसाठी आधुनिक काळात लिहिलेलं एक भावपूर्ण प्रेमगीत म्हणजे हा काव्यसंग्रह.
तरुणांच्या आणि मुलांच्या मनात निसर्गप्रमाची जाणीव जागवण्यात हा संग्रह नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल, याची मला खात्री आहे.
Dr. Jagganath Patil | Sakal Prakashan | 2026 | Marathi | Paperback | 46 |
Share
