Akshargranth
Maharani Bayajabai Shinde Dakhkhanchi Saundaryalatika बायजाबाई शिंदे दख्खनची सौंदर्यलतिका
Maharani Bayajabai Shinde Dakhkhanchi Saundaryalatika बायजाबाई शिंदे दख्खनची सौंदर्यलतिका
Couldn't load pickup availability
Maharani Bayajabai Shinde Dakhkhanchi Saundaryalatika by Dr. Suvarna Naik Nimbalkar
बायजाबाई शिंदे दख्खनची सौंदर्यलतिका | बायजाबाई शिंदे यांचा हा जीवनपट आहे. घाटगे घराणं हे त्यांचं माहेर. स्वातंत्र्याचा व शौर्याचा वारसा त्यांना आपले पिता सर्जेराव घाटगे यांच्याकडूनच मिळाला. त्या सौंदर्यवती होत्या. त्यांचा विवाह महादजी शिंदे यांचे उत्तराधिकारी दौलतराव शिंदे यांच्याशी झाला. विवाहानंतर राज्यकारभारात, युद्धात बायजाबाईंचा सहभाग असायचा. पतीच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेरची राज्यव्यवस्था पाहण्यास त्यांनी सुरुवात केली; त्यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी व्यवसाय, व्यापार वाढवून आपली राज्यातील तिजोरी, कोषागार समृद्ध केले. सैन्याची चोख व्यवस्था करून आपल्या राज्यातील पेंढारी व ठग लोकांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला, मक्त्याच्या मामलतीची जी चाल होती, ती बंद करण्याचा प्रयत्न केला. जनकोजी या त्यांच्या दत्तक पुत्रामुळे त्यांना बराच त्रास भोगावा लागला. त्यांचे नातू जयाजीराव शिंदे यांनी मात्र बायजाबाई साहेबांना त्यांच्या वृद्धापकाळात खूप जपले. भारताच्या पहिल्या महिला बँकर म्हणून लौकिक मिळवणार्या बायजाबाई यांचा प्रेरक जीवनप्रवास.
Dr. Suvarna Naik Nimbalkar | Mehta Publishing House | Latest Edition | Language - Marathi | Paperback | Pages 188 |
Share
