Akshargranth
Mahasamrat Asmanbharari महासम्राट अस्मानभरारी
Mahasamrat Asmanbharari महासम्राट अस्मानभरारी
Couldn't load pickup availability
Mahasamrat Asmanbharari By Vishwas patil महासम्राट अस्मानभरारी
"शिवरायांच्या देदीप्यमान कारकिर्दीतील एक वादळी कालखंड. राजांनी स्वतःचे आरमार घेऊन दक्षिणेत बसरूर या व्यापार नगरीची पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून केलेली मुक्तता! तसेच पुरंदरच्या लढाईचा आणि मुरारबाजी देशपांडे यांनी दिलेल्या अभूतपूर्व लढ्याचा, तसेच नेताजी पालकर यांच्या तेजस्वी स्वामीभक्तीचा धांडोळा. शिवराय आणि औरंगजेब या दोघांमध्ये घडलेला जळता, धुमसता कडो-विकोडीचा संघर्ष! महाराजांनी औरंगजेबाच्या दहा लाख फौजेच्या शस्त्रसामर्थ्याला भेदून आग्र्याच्या बंदिवासातून घेतलेली उत्तुंग अस्मानभरारी! आग्रा मोहिमेचा पुनर्विचार करायला लावणाऱ्या नव्या ऐतिहासिक संशोधनाचे विस्मयकारक व अद्भुत कंगोरे! कादंबरीकार विश्वास पाटील यांनी आग्रा, काशी, प्रयाग ते अमरकंटक, पलामू , झारखंड आणि छत्तीसगडच्या जंगलरानांतून शिवरायांच्या परतीच्या प्रवासाचा घेतलेला हा रोमहर्षक शोध! "
Share
