Akshargranth
Mahatma Gandhi Akshep Aani Vastav by Jagdhish Kabare
Mahatma Gandhi Akshep Aani Vastav by Jagdhish Kabare
Couldn't load pickup availability
महात्मा गांधी : आक्षेप आणि वास्तव । जगदीश काबरे
दीर्घ काळ बाळगलेली स्वप्ने साकार होत नाहीत, असे केवळ राजकीय पुढारीपण करणाऱ्यांनाही अनेकदा आपल्या जीवनाच्या अखेरीस दिसून येते. महात्मा गांधी हे केवळ राजकीय नेते नव्हते आणि अशांची स्वप्ने अर्धवट राहणे वा पराभूत झाल्याची खंत त्यांना वाटणे, हा नित्याचा अनुभव आहे. अगदी गौतम बुद्ध, येशू यांच्यापासून पाहिले, तरी त्यांना साफल्याचा आनंद लाभला, असे म्हणता येणार नाही. येशूला तर त्याच्या लोकांनीच क्रूसावर चढविले आणि हे लोक काय करीत आहेत ते, त्यांचे त्यांनाच समजत नाही, म्हणून परमेश्वराने त्यांना क्षमा करावी, अशी प्रार्थना त्याने केली. महात्मा गांधींनी स्वतःला बुद्ध वा येशू असे मानले नाही आणि आपण त्यांना असे देवत्व प्राप्त करून देणेही योग्य नाही. गांधीजींचे भक्त वा मतलबी राजकारणी काहीही म्हणोत, महात्माजींना स्वतःच्या तसेच या समाजाच्या मर्यादा सर्वात अधिक कळत होत्या. तसाच विचार केला, तर महात्माजींना ज्या प्रकारचा समाज अभिप्रेत होता, त्यातले आज येथे जवळपास काहीच शिल्लक नाही. दुसरे असे की, ज्या समाजाची कल्पना त्यांनी केली होती, त्याचे समग्र स्वरूप त्यांनी तपशिलाने मांडले होते, असेही नव्हे. असे असतानाही महात्माजींचे स्मरण करण्यात ढोंगीपणा होत नाही. कारण विशिष्ट प्रकारची समाजरचना कशी असावी, यासाठी महात्मा गांधींकडे आपण वळलो नाही, तरी माणूस कसा असावा, यासाठी त्यांचे विचार समजावून घेणे उपयुक्त ठरेल. यासंबंधात प्रारंभापासून अखेरपर्यंत महात्माजींचे सार्वजनिक जीवन आठविले पाहिजे.
जगदीश काबरेंनी गांधीजींचा हा शोध घेताना त्यांच्या टीकाकारांच्या अभद्र टीकेचा तर्कशुद्ध आणि माहितीपूर्ण प्रतिवाद केला आहे. म्हणूनच हे पुस्तक संग्राह्य झाले आहे.
– कुमार केतकर
Lokvadmay Grih Prakashan |
Share
